सोमवार, 5 अक्टूबर 2015

विद्यार्थ्यांच आत्महत्येच सोलुशन- नापास शिक्षक

स्वर्गीय स्वाति निकुरे
      तू हे काय केलेस.? जीव घालवुन काय साध्य केलेस..? तुला कोणते सर किंवा अजुन कोणी काही बोलले असतील म्हणून तू आत्महत्या करावी एवढी कमजोर तू निश्चित नव्हती..मग ऎसे काय घडले..? आणि काही ही झाल म्हणून आत्महत्या करणे हा उपाय नव्हे.. पोरी या एका सोलुशन ने आम्हा सर्व शिक्षकांना नापास केले.. कॉलेज मधील शिक्षक तुम्हाला बोचरे बोल बोलले आणि तुम्हाला जिव्हारि लागणे स्वाभाविक आहे..पण म्हणून आत्महत्या हा उपाय नव्हे.. तू मला सांगायच किंवा कॉलेज मधे एखाद्या अन्य शिक्षकाला बोलायच त्या त्रास वाटणाऱ्या शिक्षाकाविषयी म्हणजे आम्ही काही तरी उपाय काढला असता.. पण पालकाना ऎसे सोडून तू गेलीस आणि आम्ही मात्र याच पश्चातापात आहोत की शिक्षक म्हणून आम्ही नापास झालो..आम्ही एवढ्या वर्षात तुमच्यात हा आत्मविश्वास जागृत करू शकलो नाही की कितीही संकट आली तरी हरायच नसते जीव द्यायचा नसतो. म्हणजेच तुला अभद्र बोलणारा तो शिक्षक आणि आम्ही अशी एकंदरित सर्व व्यवस्थाच नापास झाली.. तुझ्या आत्म्याला शान्ति लाभों. बाकी अन्य विद्यार्थ्यांना एवढेच सांगेन की तुमच्या आयुष्यात काही ही अडचन असेल संकट असतील कोनाशी तरी मनमोकळे बोला. आमच्याशी बोला. आपण निश्चितच मार्ग काढू. सर्व विद्यार्थयाना आवाहन आहे की त्यांनी कोणी या आत्महत्येच्या मार्गाचा स्वीकार करू नए..!
            सदैव तुमचाच
         प्रा. ज्ञानेश्वर गेटकर