"अरे जोर लगाओ यार..! बोलो सच्चिदानंद साईनाथ महाराज की जय..!" गाभाऱ्यात एकच गर्दी, कोलाहल आणि घोषणांचा उदघोष. बाहेर झेंडूच्या माळा तोरणे मांगल्याच वातावरण असल्याच सूचक होत्या. एरवी कामात डुबलेले आणि घामाने डबड़बलेले लोक मंगलवेष परिधान करून या मांगल्याच्या वातावरणात भर घालत होते. बाहेर शेकडो लोक ( सॉरी भाविक ह..) गोळा होते. सकाळपासून सत्यनारायनाची पूजा सुरु होती, अथर्वशीर्षाच पठन सुरु होते.. बघता बघता 1 वाजायला आला. आता भाविकांच्या पोटातला देव जागा झालेला होता, त्यामुळे पंगतीत आधीच मिळेल ती जागा पकडून भाविक आसनस्थ झालेले होते.
मात्र एक अडचण होती पोटोबाच्या पूजेमधे..कारण साईंबाबांच्या मुर्तीची प्रतिष्ठापना व्हायची होती. आणि त्यामुळे सुरुवातीला नमुद केलेला गदारोळ सुरु होता. गाभाऱ्यात मार्बलनी भिंती चमकत होत्या. साईंच्या स्थापनेसाठी केलेले आसन सुध्दा उंच आणि सुबक होते. आणि साक्षात साईंच्या मुर्तीची तर बातच न्यारी. पांढराशुभ्र संगमरवर सलग घडवल्या गेला होता. टाकीचे घाव सोसल्याशिवाय देवत्व येत नाही म्हणतात ते हेच असावे कदाचित. ज्या साईनाथानी कधी जमिनीवर झोपुन रात्रि काढल्या असतील, त्यांना आज संगमरवराचा साज; ज्यांनी कधी विटलेले कपडे नेसुन दिवस घालवले असतील त्यांना आज ऊँची सोवळ नेसवल्या जात होते; ज्यांना त्यांच्या जिवंतपणी अनंत यातना, त्रास मर्त्यलोकातील माणसाने दिला असेल आज त्याचेच आम्ही वंशज आज त्या साईनाथाला देव मानून अमरत्व बहाल करत होतो. माझा मलाच अभिमान वाटला.." स्वता ईशपुत्र असणारा मनुष्य एका संताला देवत्व बहाल करतो. स्वता क्षर असणारा मनुष्य एका असामान्य मनुष्याला अक्षर , अजर, अमर करतो. आणि ह्याच साधन काय तर फक्त भक्ति. साईंनाथांवरची निस्वार्थ निरपेक्ष भक्ति." अनायास माझ्या मुखातून आवाज आला , " अनंतकोटि ब्रह्मांडनायक राजाधिराज महाराज, श्री सच्चिदानंद साईनाथ महाराज की जय.." पाठोपाठ जोरात शेकडो मुखातून आवाज आला "जय..!"
माझा आवाज लोपला आणि काही वेळाने तो ओरडला " साईनाथ महाराज की जय.!" हो तो ओरडला. पण तो ओरडला ते तीच लक्ष वेधुन घेण्यासाठी. कदाचित तो आलाच तिच्यासाठी होता. एवढ्या गर्दीमधे त्याची नजर फक्त तिच्यावर स्थिरावलेली होती. तिकडे गायंत्रि मंत्राच उच्चारण आणि इकडे भाऊच्या मनात" तेरे मस्त मस्त दो नैन मेरे दिल का ले गये चैन."
वास्तविकता त्याला रात्रितुन ताप, खोकला झाला होता. काय आश्चर्य बघा आदल्या दिवशी आइसक्रीम तिने खाल्ले आणि न खाताच साहेबाला खोकला सर्दी ताप. ते सुध्दा रात्रितुनच. मित्र बोलला सकाळी की बरे नाही तर नको जाऊ. पण साहेबाने ऐकले तर कैसे व्हायचे. शेवटी " प्यार का खुमार" म्हणतात ते हेच. त्याला प्रचंड ताप भरला होता, उभे राहणे अशक्य होत होते. पण काही क्षणात कुठून ऊर्जा आली देव जाणे. आता एवढ्या आनंदी भावनेने उदघोष, जयघोष करत होता. एवढ्यात दोघांची नजरभेट झाली आणि मनात " गुलाबी आँखे जो तेरी देखी, शराबी ये दिल हो गया" वाजायला लागले. काय माणूस आहे भोवताली तीर्थ प्रसाद वितरण होत आहे आणि हे "शराबी दिल" चे विचार मनात.
ईश्वराची एवढी भक्ति, एवढे भोग, एवढी सजावट, त्याला फ़ालतूपना वाटायच. इथे उधळपट्टी करण्याऐवजी गरिबांना दान करा, समाजाला वाटा, असे क्रांतिकारी विचार त्याचे होते. पण आज मात्र त्याच स्वताच्याच विचारांशी द्वन्द्व सुरु होते." मी नाही का तिच्यावरील प्रीतीमुळे तिच्यावर सर्व काही ओवाळायला तैयार झालो. तिने होकार द्यावा म्हणून तिच्या साठी काही ही करायला तैयार झालो. तिच्यासोबत सुखी संसार करण्यासाठी सर्व संपत्ति तिच्या पायाशी ओतायला तैयार झालो. मग ईश्वरासाठी त्याच्या भक्तांनी असले सोहळे केले तर काय हरकत.? त्यांच्या भक्तित प्रीतीच आहे न.. आणि माझ्या प्रीतीत भक्तिच ना.? फरक हाच की त्या भक्तांनी ईश्वराच प्रतिक म्हणून एक मूर्ति उभारली. आणि माझ्या प्रीतीची भक्ति जिच्यावर आहे ती जिवंत सदेह व्यक्ति.!"
त्याच्या मनातील द्वंद्व काही केल्या संपत नव्हते की ही सर्व करामत कशाची भक्तीची की प्रीतीची.? आणि मी ... आता या भाऊच्या संगतीमुळे मी सुध्दा पेचात अडकलो की ही धुन भक्तीची की प्रीतीची....? आम्ही जायला निघालो, तो गुणगुनत होता..
" तेरा तुझको सौप दे क्या लागत है
मोर
मेरा मुझ में कुछ नाही
जो होवत सो तो...
........
लागी तुमसे मन की लगन...!"
मंगलवार, 3 नवंबर 2015
भक्तीची की प्रीतीची
सदस्यता लें
संदेश (Atom)