आज १५ जानेवारी , भारतीय सैन्य दिन..!
भारतीय सैन्याचे देल्हि येथील पथ संचलनाचे दूरदर्शन वर थेट प्रक्षेपण बघत असताना एक विश्वास मनांमध्ये जागला...कि कितीही संकटे आलीत, भ्रष्टाचाराचे अंतर्गत कलहाचे , परकीय आक्रमणांचे वादळ घोंघावले तरीही या सिंहहृदयी सैनिकांचे सामर्थ्य आमच्या पाठीशी असताना आम्ही सुरक्षित आहोत.!
मात्र आपले जीव तळतावर घेऊन लढणाऱ्या या सैनिकांप्रती आमचे काही कर्तव्य नाहीत काय?
त्यांच्या हौतात्म्यावर आम्ही दुखी का होत नाही ? आम्हाला परकीय शत्रूंचा राग का बरे येत नाही?
काय भारतीय समाज आज एवढा आत्मकेंद्रित झालाय?
जर नसेल तर आम्हाला ते दाखवून द्यावे लागेल ...!
भारतीय सैन्य दिनाच्या निमित्ताने सेवा निवृत्त , कार्यरत असणार्या सर्व सैनिकांना जय हिंद..! :- ज्ञानेश्वर
कोई टिप्पणी नहीं:
एक टिप्पणी भेजें