गुरुवार, 5 जून 2014

लोकनाथाची अन्तेष्टि


सशस्त्र सैनिकांनी सलामी दिली ..!
पंकजा ताई नि मुखाग्नि दिली..!
आणि शेवटी एकदाची लोकनेत्याची यात्रा कायमची थांबली.!
पण थांबत नव्हते ते लाखो डोळयातले अश्रु...
थांबत नव्हत्या त्या लाखो कंठातल्या गर्जना..
"परत या, परत या..." "मुंडे साहेब अमर रहे", अशा घोषणांनी आसमंत निनादत होता..!
महाराष्ट्राच्या राजकारणात असो की मुंबईच्या अंडरवर्ल्ड मधे असो, गोपीनाथजी मुंडे यांनी आपली वेगळीच धमक राखली आणि अद्वितीय अशी छाप सोडली.!
भाजप ला उभे करण्यात सिंहाचा वाटा आणि मराठवाड्याला न्याय देण्याचा वाटा असो, हा नेता नेहमी अग्रेसर राहिला.!
कदाचित संघ संस्कार सदैव अग्रेसर राहण्यास भाग पाडत असतील..!
या एवढ्या गर्दिने एक सत्य मात्र विशद केले
की ही गर्दी कोणत्या राजकीय पक्षाची नव्हती.
ही गर्दी होती सामान्य लोकांची.!
असे लोक ज्यांच्यासाठी तो नेता दिवस रात चंदना परी झिजला.!
आणि म्हणून गोपीनाथ हे लोकनाथ होते.!
नि या लोकनाथाची अशी अखेर आम्हाला सुध्दा धक्का देऊन गेली.!
ईश्वर मुंडे- महाजन कुटुम्बीयांना या अपिरिमित दुखातुन सावरन्याचे बळ देओ हीच श्रीचरणी इच्छा.!

दाटल्या कंठात आता भाव सारे साठले
ओल्या हुंदक्यात आता शब्द सारे गोठले
लोकनेता हां जाहला असा भूमीचा
अखेरचे बघण्या त्यास लोक आज थांबले.!

काय तो दिमाख होता कालच्या दिवसाचा
काय तो साज शृंगार त्या स्वागत मंचाचा
सुर्याला बुडवून कशे पहाट देव आक्रसले
दुखाच्या गडद छायेने गाव आज अन्धारले..!

आज फ़क्त आवाज येतो कारुण्य रुदनाचा
मालकाविना पोरक्या त्या कापऱ्या सदनाचा
मातीचे चैतन्य आज अग्निला समरसले
अखेरचा राम राम घेता गाव आज हिरमुसले..!
  -ज्ञानेश

2 टिप्‍पणियां: