मंगलवार, 17 जून 2014

सावित्री सोबत सत्यवान पण….


                      हल्ली बहुतांश लोकांकडे संध्याकाळी किंवा सकाळी टीव्ही वर मराठी मालिका सुरु असतात..! काही वर्षांपूर्वी फ़क्त हिंदी मालिका जास्त बघितल्या जायच्या पण आता परिस्थिति बदलली आहे आणि मराठी मालिका जास्त बघितल्या जातात.! मराठी व्यक्ति म्हणून छाती सुध्दा छप्पन इंच नाही पण थोड़ी फार निश्चितच फुगते.! जे सर्वांच्या घरी असते तेच मालिकांचे अधिराज्य माझ्याही घरी तसेच आहे.. आई बाबा बहिणी सर्व बघतात त्यामुळे मला पण दोनच पर्याय असतात एक तर आपले काम करणे किंवा निमूटपणे जे सुरु आहेत ते बघणे.!

                     असो तर त्या दिवशी एक मालिका सुरु होती "जुळून येती रेशीमगाठी". बऱ्याच जनांना ही मालिका आवडते. मला सुध्दा आवडते कारण दोन आहेत-
                                               दुसरे कारण म्हणजे या मालिकेचे गाणे खुप छान आहे
                                               आणि पाहिले कारण म्हणजे नायिका "प्राजक्ता माळी", अर्थात तुम्हा आम्हा सर्वांची लाडकी मेघना.!
                    त्यात वटपौर्णिमेचा सण साजरा करताना दाखवत होते आणि नायक म्हणजेच "आदित्य" आणि त्याचे बाबा सुध्दा महिलांच्या बरोबरीने वटपौर्णिमेचा उपवास करतात.
                   नुकताच एक दिवसा अगोदर वटपौर्णिमा साजरी झाली होती. आपल्या ही भोवतालच्या सर्व महिला उपवास ठेवून वडाला प्रदक्षिणा मारत "सात जन्म हाच पति लाभु दे" अशी विनंती करत होत्या.!
आणि पुरुष आपले त्यावर जोक्स बनवून whatsapp, फेसबुक या सोशल मीडिया वर फॉरवर्ड करण्यात बिजी होता.!
मला पण भरपूर मेसेजेस आलेत whatsapp वर.
                   एका मित्राने पाठवलेला इंग्लिश मधला मेसेज होता त्याचा अर्थ असा होता की "दुसऱ्या पक्षाच्या संमतिशिवाय करार नुतनीकरण करायचा उत्सव" एका इमेज मधे असे दाखवले होते की महिला वडाला प्रदक्षिणा मारत म्हणून राहिल्यात, "वडा पाव, वडा पाव".!
                 असले विनोद सुरु असतानाच एका मैत्रिणीने वटसावित्रिचे महत्व अधोरेखित करणारा मेसेज केला ज्यात "सावित्री-सत्यवान" यांची कथा होती. आपण बहुतेकांना ती कथा माहिती आहे, त्यातील सावित्रिचे सत्यवान साठी असणारे प्रेम, तिचा त्याग तिची महानता,आदि सर्व गोष्टी आपण सर्व जानतोच.!
               पण माझ्या मैत्रिणीच्या मेसेज मधे एक प्रश्न होता
"तुम्ही पुरुष कधी आम्हा बायकांसाठी उपवास ठेवला आहे..?" एकदम तो प्रश्न आणि मालिकतील तो प्रसंग यांचा टाइमिंग एकच.
             मी पण विचार केला की स्त्रिया पुरुषांसाठी एवढे उपास तापास, व्रत वैकल्ये करतात. एखाद्या स्त्रीचा नवरा चांगला नसेल, तिला त्रास देत असेल, मारझोड करत असेल, तरी ती न चुकता वडाला प्रदक्षिणा मारून साताजन्मिची साथ मागतेच.
मग पुरुषांनी केले तर काय बिघडले.?
           याच बरोबर मला एक अजुन वाटले की जर एखाद्या स्त्रीचा नवरा योग्य नसेल तर तिने असले व्रत आणि उपवास करून सात जन्म तोच भेटावा म्हणून वटपौर्णिमा करुच नये.! अशा व्यक्तिसोबत एक जन्माची सोबत भेटली ते काही कमी दुर्दैव.!
           त्या मालिकेतील नायक आणि त्याचे बाबा जसे आपापल्या बायकांसाठी उपवास ठेवतात तसेच आपल्या तरुण आधुनिक पीढ़ीने ठेवला तर.! ज्यांचे लग्न झालेले आहेत अशांनी आपल्या बायकांसाठी आणि ज्यांचे प्रेम आहेत अशा बॉयफ्रेंडनि आपल्या गर्लफ्रेंडसाठी उपवास ठेवायला हरकत नाही.
          कारण काळ आधुनिक झाला आहे आणि आयुष्य सुन्दर बनवण्यासाठी जशी सावित्रीला जशी सत्यवानाची गरज असते त्याप्रमाणेच सत्यवानाला सुध्दा सावित्रीची गरज आहेच की..!
म्हणून 'सावित्री सोबत सत्यवान पण' समान हे सूत्र अमलात आणता येईल काय.? विचार करुया..!

सावित्री सोबत सत्यवान पण साथ मागेल सात जन्माची
सावित्री सोबत सत्यवान पण करील सत्यता उपवासाची.!
फ़क्त तीच नाही तर तो सुध्दा रडेल ओक्साबोक्शी..
सावित्री सोबत सत्यवान पण करेल पुर्तता वचनांची..!
                                                                                      -ज्ञानेश



कोई टिप्पणी नहीं:

एक टिप्पणी भेजें