सावळे तुझे रूप जे भाळी
ते लेवु दे या उंच आभाळी..
खुप झाला ताप अवकाळी
येऊ दे धरेला दिन पावसाळी..!
कशी करावी तुझी पूजा आता
आम्हा भक्तीची नाही जाण..
एवढीच आम्हा एक आहे जाण
विठ्ठला तूच आमचा मान..।
काळया भूमीवर निशब्द प्रेम करे..
कास्तकार आम्ही गरिबाची लेकरे..
काळया गर्भातुन जन्मे पोटाची शिदोरी
फुलन्या फळन्या तूच साथ दे रे..!
आम्हा नाही कसली अनामिक भीती
निस्वार्थ, निश्छल असली अविचल प्रीती
राहु दे विश्वात सदा सुख, समृध्दी शांति
अक्षर असू दे ह्रदयात विठ्ठल भक्ति..!
-ज्ञानेश
कोई टिप्पणी नहीं:
एक टिप्पणी भेजें