शनिवार, 7 जून 2014

प्यासा देश- अंतकरण की करुणा

                    सकाळी सकाळी चहा घेता घेता न्यूज़ चैनल्स पलटवत होतो. बातम्यांच्या महापुरात एका बातमीनि मन हेलावून टाकले आणि आजूबाजूची परिस्थिति डोक्यात भिनभिन करायला लागली.
                    ती विषादपूर्ण बातमी म्हणजे भर उन्हाळयात सूर्य तापत असताना  देशाला जाणवनारी भीषण पाणी टंचाई.!
                    राजस्थान मधील ते दाहक वास्तवाचा परिचय करून देणारे चित्रीकरण बघून वाटले की तिकडे लोकाना एक घोट पाणी मुश्किल झाले नि आपण मात्र इकडे मस्त चहाचे घोट नरडयाखाली ओततोय.!
                   गेल्या कित्तेक शतका पासून पाण्याचे दुर्भिक्ष्य तसेच आहे, ते अजुन तरी संपलेले नाही. मागल्या वर्षी आपल्या महाराष्ट्रात मराठवाडयात पडलेला कोरडा दुष्काळ अजूनही ताजाच आहे.
                    वाटले होते स्वातन्त्र्यप्राप्ती नंतर आमचे भारतीय वंशाचे सरकार तरी इथल्या भुमिपुत्रांच्या मुळ वेदना जानून घेइल आणि त्यावर फुंकर घालेल पण नाही.!
सारे जग म्हणतेय की उद्या तिसरे महायुध्द पाण्यासाठी होईल आणि आमच्या देशात एकीकडे गंगा, यमुना, ब्रह्मपुत्रा अश्या अनेक बारमाही नद्या असताना त्यांचा वापर देशाच्या इतरत्र कसा करता येईल यावर काही कृती अजुन झालेल्या नाहित.
                   नाही म्हणायला आदरणीय अटलबिहारी वाजपेयी पन्तप्रधान असताना नद्या जोडणी प्रकल्प कसा पूर्णत्वास न्यायचा यावर एक समिति सुरेश प्रभु यांच्या नेतृत्वात स्थापल्या गेली होती. पण नंतर सत्तांतर होउन आदरणीय मनमोहन सिंह यांच्या नावावर सोनियांचे दिवस या देशाला आले. आणि परत तो प्रकल्प फायलींच्या ढिगाऱ्यात लुप्त झाला आणि पाणी प्रश्नाला सोनियाचे दिवस तर नाही पण साधा न्याय भेटू शकला नाही.
                    आज परत दहा वर्षानी सत्तांतर होउन नरन्द्र मोदींच्या  रुपाने एक असे नेतृत्व या देशाला लाभले आहे जे कोणाच्या हातचे कळसूत्री बाहुले नाही. असे नेतृत्व जे कणखर आहे. ज्यां कर्त्या पुरुषाने गुजरात मधे पाणी प्रश्न सोडवन्यासाठी कृती केलेली आहे.
आशा करतो की नरेन्द्रभाई आपल्या पाच वर्षांच्या काळात हां भीषण असा पाणी प्रश्न सोडवण्याचा प्रामाणिक प्रयत्न करतील.
                   आदरणीय पन्तप्रधान याना विनंती करतो की आपण कृती सुरु केलेली आहेच फ़क्त आता सकारात्मक परिणाम पाणीटंचाई संपुष्टात होण्यात दिसू दया
                  क्यों की अच्छे दिन आने के लिये.
हमारी देश की प्यास मिटनी जरुरी है.!
और यह जन जन के अंतकरण की करूणा है.!
                   जय हिन्द.! वन्दे भारत.!
                      - ज्ञानेश्वर जगन्नाथ गेटकर
                            ०९६६५८५३२१२

तपती गर्मी, तपता आँगन
तपता तन मन, तपता जन जन
बस तप रहा है मेरा यह देश
सदियों से प्यासा है मेरा यह देश.!

कहा गये वो बादल, जो बना गये पागल
कहते थे भर देंगे ख़ुशी से तेरा आँचल
कभी न पूरा हो वो वादा कर गये ऐ देश
सदियों से प्यासा है मेरा यह देश..!

सूर्यनारायण का ताप तो देखो
प्रकृति का यह श्राप तो देखो
कभी न दे सके जनता को छाव ऐ देश..
सदियों से प्यासा है मेरा यह देश..!

एक एक बूंद पाणी को तरसे पंछी
एक एक कण दाने को भटके पंछी
ना भूक मिटा सके ना प्यास ऐ देश
सदियों से प्यासा है मेरा यह देश..!

हे पृथ्वी माँ अब तो करो कुछ उपाय
चारो तरफ सुखद हरियाली आ जाये
ना मरे कोइ भूक से ना प्यास से ऐ देश..
सदियों और प्यासा न रहे मेरा यह देश.!
          -ज्ञानेश

6 टिप्‍पणियां: