धन्यवाद …धन्यवाद …धन्यवाद …!
आज मी आनंदात स्वातंत्र्य दिन साजरा करत आहे,
आज मी मुक्तपणे मनमोकळा श्वास घेत आहे!
एक भारतीय म्हणून तुम्हा असंख्य हुतात्म्यांना धन्यवाद।!
कधी तुम्ही अहिंसेच्या मार्गाने लढलात,
कधी तुम्ही सशस्त्र क्रांतीच्या मार्गाने लढलात,
स्वताच्या धारोष्ण रक्ताच्या धारा वाहिलात,
भारत मातेसाठी हसत खेळत फासावर चढलात।!
नको वाटणारे असे फाळणीचे घाव झेललात,
न मिटणारे असे आप्त मृत्यूंचे व्रण बाळगलात,
कधी रानटी आक्रमक तर कधी इंग्रजांविरुध्द,
खैबर खिंड तर कधी देशाच्या आत लढलात
आज हि तुम्ही लढतच आहात,
भ्रष्टाचार, महागाई, सामाजिक विषमते विरोधात,
आज हि तुम्ही हुतात्मे होताच आहात,
कधी सीमेवर तर कधी सीमेच्या आत।!
धन्य आहे मी भारतीय आहे, भारत माझा देश आहे…।
असंख्य हुतात्मे माझे पूर्वज आहेत,
माझ्या या स्वच्छंदी स्वतंत्र आयुष्यासाठी कारक
तुम्हा असंख्य हुतात्म्यांना धन्यवाद।!
धन्यवाद …धन्यवाद …धन्यवाद …! - ज्ञानेश्वर जगन्नाथ गेटकर
वन्दे मातरम…….!
६७ व्या स्वातंत्र्य दिनाच्या हार्दिक शुभेछ्या ……
हे स्वातंत्र्य विश्वाच्या अंतापर्यंत असेच अबाधित राहो…. !
जय हिन्द…ज़य भारत।!