मंगलवार, 30 सितंबर 2014
नवरात्रि-शक्तिची उपासना, उत्सव मातृत्वाचा
बुधवार, 16 जुलाई 2014
नकोसा एकांत
बऱ्याच दिवसांनी आज तिथे येउन बसलो, जिथे आपण दोघे रात्रीच्या एकांतात येउन बसायचो. मस्त नेहमीप्रामाणे एकांत आहे..!
सोबत पौर्णिमेची रात्र आहे पण दाटलेल्या श्यामवर्णी मेघांनी त्या श्वेतवर्णी सोमराजाला पार झाकोळून टाकले आहे.
नेहमीप्रमाणे मी तिथल्या बाकडयावर लेटून आभाळ न्याहाळतो आहे, पण काळवंडलेला तो आसमंत माझ्याकड़े विकट हास्य लेवुन बघतो आहे. जणू तो मला आठवन करून देतो आहे की माझ्याप्रमाणे तुझ्या मनाचे आसमंत सुध्दा आता विरह दुःखानी काळवंडलेले आहे.
मला आवडतो तशी मंद वाऱ्याची ठण्ड झुळूक येत आहे, पण या झुळूकेत मला तुझ्या केसांच्या गंधाची कमतरता जाणवते. तो तो अवखळ समीर तुझ्या केसांना जेव्हा झुलवायचा तेव्हा चेहऱ्यावरील बटांना बाजुला करण्याची तुझी ती धडपड, आणि त्यावेळी तुझे ते निरागस रूप बघून वाढणारी माझ्या काळजातील धडधड.
आज तो वारा मला खिजवतो आहे की "आज माझ्या संगे मी तुझ्या प्रीतिचा गंध नाही आणला आहे तर फ़क्त तिच्या आठवणींचा बंध आणला आहे. शोध तो प्रीतगंध. आठव कधी माझ्या खोड्यांमुळे तुझ्या प्रेमात वाढ व्हायची आणि आज माझ्या वाहण्यानी तुला स्मृतीदंश होतो आहे."
मला जेव्हा कधी एकांत हवा असायचा तेव्हा मी इथे यायचो. मला कधी कोणाचा खुप राग यायचा तेव्हा मी इथे यायचो राग व्यक्त करायसाठी. कधी खुप आनंद झाला तर इथेच यायचो आनंद व्यक्त करायसाठी. इथे येउन मस्त जोरात ओरडायचो. ज्याचा राग असेल त्याला खुप शिव्या घालायचो एकांतात आणि आनंदात खुप जोरात गाणे म्हणायचो. मला जेव्हा कधी खुप विचार करायचा असेल तेव्हा मी इथे यायचो. या एकांत स्थळी मला नवीन कल्पना सुचायच्या. नि त्यांच्या जोरावर मी सर्वांची वाहवा मिळवायचो.
ही जागा फ़क्त आणि फ़क्त माझीच होती. ना मी इथे कधी कोणाला सोबत आणायचो ना कोणाला सांगायचो. हां एकांत मला हवाहवासा वाटायचा. सर्वांच्या कचाट्यातुन बाहेर निघण्यासाठी मी इथे यायचो, आपले मोकळेपण अनुभवण्यासाठी इथे यायचो.
पण एक दिवस सर्व उलटे झाले.
तुला माझ्यावर प्रेम झाले, नि मला पण. मग तुझ्याप्रेमाखातर, तुझ्या हट्टाखातर मी तुला इथे घेउन आलो. तुला तो एकांत ती जागा जाम आवडली. मग वरचेवर आपण इथे येऊ लागलोत. किती तरी रात्रि आपण अशा एकमेकांना समजुन घेण्यात नि उलगडन्यात घालवल्या. मग तर ती जागा आणि तू अशी सवयच झाली मला. तुझ्याविना त्या जागेची कल्पनासुध्दा करवत नव्हती मला. इथेच आपण एकमेकांना आयुष्यभर साथ देण्याची शपथ घेतली. आणि तूच मला इथे एकटे सोडून निघून गेलीस. आज तुझ्याविना ही जागा पोरकी वाटते. कधी काळी हवाहवासा वाटणारा हां एकांत मला आता खायला वाटते.
काय गम्मत आहे बघ, स्वताला मोकळे करण्याचा उपाय असणारी ही जागा आज मला तुझ्या आठवनिंच्या पाशात अडकवते आहे. आज हां एकांत तुझ्या आठवनींनी भरगच्च झाला आहे. या एकांतात मला तुझ्या प्रीतबंधात बांधल्याची सारखी आठवन होते.
तू मला सोडून निघून गेलीस, तू पुण्यात्मा असल्यानि तुला मोक्ष मिळाला. आज स्वर्गातुन माझी अशी अवस्था बघताना तुला त्रास होत नाही काय ग.? याच ठिकाणी आपली प्रीत फुलली आणि याच ठिकाणी तुझ्या शेवटचा श्वास घ्यावा हां काय दैदुर्वविलास म्हणावा.
शेवटी आता माझ्या जीवात जीव आला बघ, आपण दोघांनी इथे लावलेल्या मोगऱ्याच्या फुलांचा सुगंध वारा आपल्या सोबत घेउन आला आणि मी अभिमानानी त्याला बोललो की तुला जिकडे वाहायचे तिकडे खुशाल वाहा, पण तिच्या माणुसकीचा आणि आमच्या प्रीतिचा हां सुगंध मात्र तुला सोबत न्यावेच लागेल. आणि चहुबाजुला जगात प्रेमाच्या कुपितिल सुगंधी अत्तर दरवळेल.
बुधवार, 9 जुलाई 2014
विठ्ठला भक्ति
सावळे तुझे रूप जे भाळी
ते लेवु दे या उंच आभाळी..
खुप झाला ताप अवकाळी
येऊ दे धरेला दिन पावसाळी..!
कशी करावी तुझी पूजा आता
आम्हा भक्तीची नाही जाण..
एवढीच आम्हा एक आहे जाण
विठ्ठला तूच आमचा मान..।
काळया भूमीवर निशब्द प्रेम करे..
कास्तकार आम्ही गरिबाची लेकरे..
काळया गर्भातुन जन्मे पोटाची शिदोरी
फुलन्या फळन्या तूच साथ दे रे..!
आम्हा नाही कसली अनामिक भीती
निस्वार्थ, निश्छल असली अविचल प्रीती
राहु दे विश्वात सदा सुख, समृध्दी शांति
अक्षर असू दे ह्रदयात विठ्ठल भक्ति..!
-ज्ञानेश
मंगलवार, 17 जून 2014
सावित्री सोबत सत्यवान पण….
हल्ली बहुतांश लोकांकडे संध्याकाळी किंवा सकाळी टीव्ही वर मराठी मालिका सुरु असतात..! काही वर्षांपूर्वी फ़क्त हिंदी मालिका जास्त बघितल्या जायच्या पण आता परिस्थिति बदलली आहे आणि मराठी मालिका जास्त बघितल्या जातात.! मराठी व्यक्ति म्हणून छाती सुध्दा छप्पन इंच नाही पण थोड़ी फार निश्चितच फुगते.! जे सर्वांच्या घरी असते तेच मालिकांचे अधिराज्य माझ्याही घरी तसेच आहे.. आई बाबा बहिणी सर्व बघतात त्यामुळे मला पण दोनच पर्याय असतात एक तर आपले काम करणे किंवा निमूटपणे जे सुरु आहेत ते बघणे.!
असो तर त्या दिवशी एक मालिका सुरु होती "जुळून येती रेशीमगाठी". बऱ्याच जनांना ही मालिका आवडते. मला सुध्दा आवडते कारण दोन आहेत-
दुसरे कारण म्हणजे या मालिकेचे गाणे खुप छान आहे
आणि पाहिले कारण म्हणजे नायिका "प्राजक्ता माळी", अर्थात तुम्हा आम्हा सर्वांची लाडकी मेघना.!
त्यात वटपौर्णिमेचा सण साजरा करताना दाखवत होते आणि नायक म्हणजेच "आदित्य" आणि त्याचे बाबा सुध्दा महिलांच्या बरोबरीने वटपौर्णिमेचा उपवास करतात.
नुकताच एक दिवसा अगोदर वटपौर्णिमा साजरी झाली होती. आपल्या ही भोवतालच्या सर्व महिला उपवास ठेवून वडाला प्रदक्षिणा मारत "सात जन्म हाच पति लाभु दे" अशी विनंती करत होत्या.!
आणि पुरुष आपले त्यावर जोक्स बनवून whatsapp, फेसबुक या सोशल मीडिया वर फॉरवर्ड करण्यात बिजी होता.!
मला पण भरपूर मेसेजेस आलेत whatsapp वर.
एका मित्राने पाठवलेला इंग्लिश मधला मेसेज होता त्याचा अर्थ असा होता की "दुसऱ्या पक्षाच्या संमतिशिवाय करार नुतनीकरण करायचा उत्सव" एका इमेज मधे असे दाखवले होते की महिला वडाला प्रदक्षिणा मारत म्हणून राहिल्यात, "वडा पाव, वडा पाव".!
असले विनोद सुरु असतानाच एका मैत्रिणीने वटसावित्रिचे महत्व अधोरेखित करणारा मेसेज केला ज्यात "सावित्री-सत्यवान" यांची कथा होती. आपण बहुतेकांना ती कथा माहिती आहे, त्यातील सावित्रिचे सत्यवान साठी असणारे प्रेम, तिचा त्याग तिची महानता,आदि सर्व गोष्टी आपण सर्व जानतोच.!
पण माझ्या मैत्रिणीच्या मेसेज मधे एक प्रश्न होता
"तुम्ही पुरुष कधी आम्हा बायकांसाठी उपवास ठेवला आहे..?" एकदम तो प्रश्न आणि मालिकतील तो प्रसंग यांचा टाइमिंग एकच.
मी पण विचार केला की स्त्रिया पुरुषांसाठी एवढे उपास तापास, व्रत वैकल्ये करतात. एखाद्या स्त्रीचा नवरा चांगला नसेल, तिला त्रास देत असेल, मारझोड करत असेल, तरी ती न चुकता वडाला प्रदक्षिणा मारून साताजन्मिची साथ मागतेच.
मग पुरुषांनी केले तर काय बिघडले.?
याच बरोबर मला एक अजुन वाटले की जर एखाद्या स्त्रीचा नवरा योग्य नसेल तर तिने असले व्रत आणि उपवास करून सात जन्म तोच भेटावा म्हणून वटपौर्णिमा करुच नये.! अशा व्यक्तिसोबत एक जन्माची सोबत भेटली ते काही कमी दुर्दैव.!
त्या मालिकेतील नायक आणि त्याचे बाबा जसे आपापल्या बायकांसाठी उपवास ठेवतात तसेच आपल्या तरुण आधुनिक पीढ़ीने ठेवला तर.! ज्यांचे लग्न झालेले आहेत अशांनी आपल्या बायकांसाठी आणि ज्यांचे प्रेम आहेत अशा बॉयफ्रेंडनि आपल्या गर्लफ्रेंडसाठी उपवास ठेवायला हरकत नाही.
कारण काळ आधुनिक झाला आहे आणि आयुष्य सुन्दर बनवण्यासाठी जशी सावित्रीला जशी सत्यवानाची गरज असते त्याप्रमाणेच सत्यवानाला सुध्दा सावित्रीची गरज आहेच की..!
म्हणून 'सावित्री सोबत सत्यवान पण' समान हे सूत्र अमलात आणता येईल काय.? विचार करुया..!
सावित्री सोबत सत्यवान पण साथ मागेल सात जन्माची
सावित्री सोबत सत्यवान पण करील सत्यता उपवासाची.!
फ़क्त तीच नाही तर तो सुध्दा रडेल ओक्साबोक्शी..
सावित्री सोबत सत्यवान पण करेल पुर्तता वचनांची..!
-ज्ञानेश
शनिवार, 7 जून 2014
प्यासा देश- अंतकरण की करुणा
सकाळी सकाळी चहा घेता घेता न्यूज़ चैनल्स पलटवत होतो. बातम्यांच्या महापुरात एका बातमीनि मन हेलावून टाकले आणि आजूबाजूची परिस्थिति डोक्यात भिनभिन करायला लागली.
ती विषादपूर्ण बातमी म्हणजे भर उन्हाळयात सूर्य तापत असताना देशाला जाणवनारी भीषण पाणी टंचाई.!
राजस्थान मधील ते दाहक वास्तवाचा परिचय करून देणारे चित्रीकरण बघून वाटले की तिकडे लोकाना एक घोट पाणी मुश्किल झाले नि आपण मात्र इकडे मस्त चहाचे घोट नरडयाखाली ओततोय.!
गेल्या कित्तेक शतका पासून पाण्याचे दुर्भिक्ष्य तसेच आहे, ते अजुन तरी संपलेले नाही. मागल्या वर्षी आपल्या महाराष्ट्रात मराठवाडयात पडलेला कोरडा दुष्काळ अजूनही ताजाच आहे.
वाटले होते स्वातन्त्र्यप्राप्ती नंतर आमचे भारतीय वंशाचे सरकार तरी इथल्या भुमिपुत्रांच्या मुळ वेदना जानून घेइल आणि त्यावर फुंकर घालेल पण नाही.!
सारे जग म्हणतेय की उद्या तिसरे महायुध्द पाण्यासाठी होईल आणि आमच्या देशात एकीकडे गंगा, यमुना, ब्रह्मपुत्रा अश्या अनेक बारमाही नद्या असताना त्यांचा वापर देशाच्या इतरत्र कसा करता येईल यावर काही कृती अजुन झालेल्या नाहित.
नाही म्हणायला आदरणीय अटलबिहारी वाजपेयी पन्तप्रधान असताना नद्या जोडणी प्रकल्प कसा पूर्णत्वास न्यायचा यावर एक समिति सुरेश प्रभु यांच्या नेतृत्वात स्थापल्या गेली होती. पण नंतर सत्तांतर होउन आदरणीय मनमोहन सिंह यांच्या नावावर सोनियांचे दिवस या देशाला आले. आणि परत तो प्रकल्प फायलींच्या ढिगाऱ्यात लुप्त झाला आणि पाणी प्रश्नाला सोनियाचे दिवस तर नाही पण साधा न्याय भेटू शकला नाही.
आज परत दहा वर्षानी सत्तांतर होउन नरन्द्र मोदींच्या रुपाने एक असे नेतृत्व या देशाला लाभले आहे जे कोणाच्या हातचे कळसूत्री बाहुले नाही. असे नेतृत्व जे कणखर आहे. ज्यां कर्त्या पुरुषाने गुजरात मधे पाणी प्रश्न सोडवन्यासाठी कृती केलेली आहे.
आशा करतो की नरेन्द्रभाई आपल्या पाच वर्षांच्या काळात हां भीषण असा पाणी प्रश्न सोडवण्याचा प्रामाणिक प्रयत्न करतील.
आदरणीय पन्तप्रधान याना विनंती करतो की आपण कृती सुरु केलेली आहेच फ़क्त आता सकारात्मक परिणाम पाणीटंचाई संपुष्टात होण्यात दिसू दया
क्यों की अच्छे दिन आने के लिये.
हमारी देश की प्यास मिटनी जरुरी है.!
और यह जन जन के अंतकरण की करूणा है.!
जय हिन्द.! वन्दे भारत.!
- ज्ञानेश्वर जगन्नाथ गेटकर
०९६६५८५३२१२
तपती गर्मी, तपता आँगन
तपता तन मन, तपता जन जन
बस तप रहा है मेरा यह देश
सदियों से प्यासा है मेरा यह देश.!
कहा गये वो बादल, जो बना गये पागल
कहते थे भर देंगे ख़ुशी से तेरा आँचल
कभी न पूरा हो वो वादा कर गये ऐ देश
सदियों से प्यासा है मेरा यह देश..!
सूर्यनारायण का ताप तो देखो
प्रकृति का यह श्राप तो देखो
कभी न दे सके जनता को छाव ऐ देश..
सदियों से प्यासा है मेरा यह देश..!
एक एक बूंद पाणी को तरसे पंछी
एक एक कण दाने को भटके पंछी
ना भूक मिटा सके ना प्यास ऐ देश
सदियों से प्यासा है मेरा यह देश..!
हे पृथ्वी माँ अब तो करो कुछ उपाय
चारो तरफ सुखद हरियाली आ जाये
ना मरे कोइ भूक से ना प्यास से ऐ देश..
सदियों और प्यासा न रहे मेरा यह देश.!
-ज्ञानेश
गुरुवार, 5 जून 2014
लोकनाथाची अन्तेष्टि
सशस्त्र सैनिकांनी सलामी दिली ..!
पंकजा ताई नि मुखाग्नि दिली..!
आणि शेवटी एकदाची लोकनेत्याची यात्रा कायमची थांबली.!
पण थांबत नव्हते ते लाखो डोळयातले अश्रु...
थांबत नव्हत्या त्या लाखो कंठातल्या गर्जना..
"परत या, परत या..." "मुंडे साहेब अमर रहे", अशा घोषणांनी आसमंत निनादत होता..!
महाराष्ट्राच्या राजकारणात असो की मुंबईच्या अंडरवर्ल्ड मधे असो, गोपीनाथजी मुंडे यांनी आपली वेगळीच धमक राखली आणि अद्वितीय अशी छाप सोडली.!
भाजप ला उभे करण्यात सिंहाचा वाटा आणि मराठवाड्याला न्याय देण्याचा वाटा असो, हा नेता नेहमी अग्रेसर राहिला.!
कदाचित संघ संस्कार सदैव अग्रेसर राहण्यास भाग पाडत असतील..!
या एवढ्या गर्दिने एक सत्य मात्र विशद केले
की ही गर्दी कोणत्या राजकीय पक्षाची नव्हती.
ही गर्दी होती सामान्य लोकांची.!
असे लोक ज्यांच्यासाठी तो नेता दिवस रात चंदना परी झिजला.!
आणि म्हणून गोपीनाथ हे लोकनाथ होते.!
नि या लोकनाथाची अशी अखेर आम्हाला सुध्दा धक्का देऊन गेली.!
ईश्वर मुंडे- महाजन कुटुम्बीयांना या अपिरिमित दुखातुन सावरन्याचे बळ देओ हीच श्रीचरणी इच्छा.!
दाटल्या कंठात आता भाव सारे साठले
ओल्या हुंदक्यात आता शब्द सारे गोठले
लोकनेता हां जाहला असा भूमीचा
अखेरचे बघण्या त्यास लोक आज थांबले.!
काय तो दिमाख होता कालच्या दिवसाचा
काय तो साज शृंगार त्या स्वागत मंचाचा
सुर्याला बुडवून कशे पहाट देव आक्रसले
दुखाच्या गडद छायेने गाव आज अन्धारले..!
आज फ़क्त आवाज येतो कारुण्य रुदनाचा
मालकाविना पोरक्या त्या कापऱ्या सदनाचा
मातीचे चैतन्य आज अग्निला समरसले
अखेरचा राम राम घेता गाव आज हिरमुसले..!
-ज्ञानेश