५-६ दिवसा अगोदर रात्रि झोपी जायच्या आधी मी त्या दिवसातिल सर्व घटनाक्रम आठवत होतो. माझे काय चुकले, काय चांगले केले, काय वाईट याचा हिशेब मांडत होतो. तेव्हा मला त्या दिवशीच्या एका प्रसंगाची आठवन झाली नि मी विचारचक्रात अडकलो.
मी वर्गात मैनेजमेंट हां विषय अंतिम वर्षाच्या विद्यार्थ्यांना शिकवत होतो. त्यात उत्पादन क्षेत्र, सेवा क्षेत्रावर चर्चा सुरु होती. मी या क्षेत्रात कार्यरत दोन महिलांची नावे उच्चारली, 'इंद्रा नूयी' व 'वृंदा कोचर'. पूर्ण वर्गाचे हावभाव असे होते की जसे मी परग्रहावरिल कोण्या व्यक्तींचे नावे घेतली नि त्यामुळे "ह्या कोण बा..?" असा प्रश्न त्यांना सर्वांना पडला होता. या दोन महिलांचे नाव सुध्दा ज्यानी ऐकले वाचले नाहित ते स्वाभाविकता त्यांच्याविषयी बोलण्यात असमर्थ ठरले. मनात खुप वाईट वाटले. मग मी या दोन्ही कर्तृत्ववान महिलांची जुजबी माहिती वर्गाला दिली नि मग म्हणालो की "कमीत कमी मुलींना तरी यांच्याविषयी माहिती राहायला हव. या अशा कार्यक्षम महिलांमुळे सर्व मुलीना व स्त्रियांना मान उंचावून वागता येते, पण दुर्दैवाने आम्हाला यांच्या ऐवजी ज्यांच्यामुळे प्रसंगी मान खाली घालायची पाळी येते त्या चित्रपट अभिनेत्रींची इत्यम्भुत माहिती असते.!"
मी जे बोललो ते चुक की बरोबर नि किती टक्के ते बरोबर..? हाच प्रश्न मला छळत होता. मग विचार केला की नाही मी जे बोललो ते बरोबरच होते. कारण आज खरेच अशी परिस्थिति आहे की ज्या असंख्य स्त्रियानी आपल्या खडतर आयुष्यातून मुलीना प्रेरणा दिली त्यांच्या विषयी आमच्या मुली पुरेशा ज्ञात नाहीत. ज्या एका महानस्त्रीमुळे सर्व स्तारातिल स्त्रियांना शिक्षणाचे दार उघडे झालीत, कमीत कमी त्या सावित्री विषयी आमच्या लेकि पुरेश्या ज्ञात नाहित, हे बघून दुःख होते. आणि जर मग मुली स्वताच्या अभिमानास्पद गौरवास्पद वारशाबद्दल अशा अज्ञात असतील तर मग आमच्या स्वाभिमानाच्या मानमर्यादा कोण सांभाळणार..?
हो.! हां वारसा आहे त्या सावित्रिचा जिने दगड धोंडे खाल्ले पण आमच्या आया बहिनींसाठी शाळा सुरु करून ती यशस्वीरित्या ते कार्य पार पाडले. हा वारसा आहे त्या रानी लक्ष्मीबाईचा जीने पुरुषी पेहराव चढवला इंग्रज सरकार विरुध्द रनशिंग फुकन्यासाठी व स्वताची आहुति स्वातन्त्र्ययज्ञात दिली. हा वारसा आहे त्या अहिल्याबाई होळकर यांचा ज्यांनी पतीच्या मागे सती न जाता हजारो प्रजाजनांना लेकरे समजुन त्यांच्या कल्याणासाठी राज्यकारभार केला. हा वारसा आहे त्या किरण बेदिंचा ज्यांनी त्याकाळी एक पोलिस अधिकारी म्हणून आदर्श प्रस्थापित केला व प्रस्थापित व्यवस्थेविरुध्द लढ़न्याचि जिगर दाखवून दिली. हां वारसा आहे त्या सुधा मुर्तिन्चा ज्यांनी त्या क़ाळी अभियांत्रिकी क्षेत्रात होणारा स्त्री पुरुष भेद दूर करावा म्हणून चक्क टाटा समुहाला पत्र पाठवले व कंपनी मधे जबाबदारी पार पाडून दाखवली.
आज जेव्हा महिला सर्व क्षेत्र पादाक्रांत करत आहेत त्याच बरोबर एका बाजुला महिलांच्या सुरक्षिततेचा मुद्दा ऐरणीवर आला आहे. आज बलात्कारांचे, छेड़छाड होण्याचे प्रमाण प्रचंड प्रमाणात वाढले आहेत. त्या अनुषंगाने मला असे वाटते की स्त्रियानी सुरक्षेच्या बाबतीत सुध्दा स्वयंपूर्ण व्हावे. स्वताच्या सुरक्षेसाठी कुठल्या पुरुषावर अवलंबून राहण्यापेक्षा स्त्रियांनि आत्मनिर्भर व्हावे. नि सर्वात महत्वाचे म्हणजे प्रत्तेक स्त्रीने आपल्या मुलांना इतर स्त्रिया, मुलींचा आदर करायला शिकवावे. परस्त्रीला मातेसामान माननारे शिवराय मुलाना शिकवायला हवेत. म्हणजे स्त्रियांवारिल अत्याचारात घट होईल.
शिवाजी शिकवताना मात्र एका गोष्टीचा विसर आम्हास पड़ता कामा नये शिवाजी घडला कारण जिजाऊचे संस्कार व तिची शिकवण तशी होती. मग मुलानी शिवाजी व्हावे म्हणजेच आम्हाला आधी जिजाऊ बनायची तयारी ठेवावी लागेल. स्त्रियाना आधी स्वताच्या स्त्रित्वाचा अभिमान व आदर बाळगावे लागेल. इतर स्त्रियांविषयी आदर, काळजी, सहानुभूति व सहकार्याची भावना सतत बाळगावी लागेल. स्वताला कणखर बन्वाव्व लागेल. नि यासाठी स्त्रियांचा गौरवशाली वारसा स्मरण करणे व पीढ़ी दर पीढ़ी तो जतन करणे गरजेचे आहे. चित्रपटातील नायिकेंचे आदर्श ठेवण्याऐवजी कर्तृत्ववान महिलांचे आदर्श डोळयासमोर ठेवावे लागेल. स्वताच्या नखांना रंग लावत असतानाच स्वताच्या मनाला नि शरीराला बळकट बनवावे लागेल. आज सावित्रीबाई फूलेंची जयंती साजरी करत असताना'आम्ही सावित्रिच्या लेकि' असे म्हणतानाच आता वेळ आली आहे 'सावित्री मी ' बनायची..!
कोई टिप्पणी नहीं:
एक टिप्पणी भेजें