"फेयरवेल आहे सर. काही ही करा पण उद्या या.!", काही दिवसांअगोदर माझ्या विद्यार्थ्यांचा कॉल आला होता तेव्हा त्यानी बोललेले ही वाकये. मी रेलवे ला जॉइन व्हायच्या आधी एक अभ्यागत व्याख्याता म्हणून शिकवायला जायचो, तेथील द्वितीय वर्षाच्या विद्यार्थ्यांनी अंतिम वर्षाच्या आपल्या मित्रांसाठी निरोप समारंभ म्हणजेच फेयरवेल चा कार्यक्रम आयोजित केला होता. या कार्यक्रमात मी सुध्दा राहावे म्हणून मला आमंत्रण द्यायला आयोजन करणाऱ्या विद्यार्थ्याचा कॉल आला. पण त्यानी कॉल केला तेव्हा बराच उशीर झाला होता, त्यामुळे लगेच दुसऱ्या दिवशी सकाळच्या या कार्यक्रमाला पोहोचने अशक्य होते. मी त्यांना नम्रपणे माझी असमर्थता दर्शवली, माझ्या शुभेच्छा दिल्या आणि एक माझ्या आवाजातील सन्देश व्हाट्सअप वर पाठवून दिला. कार्यक्रम आटोपला आणि मग बऱ्याच विद्यार्थी मित्रांचे मेसेज, कॉल आले की आम्हाला तुमच मेसेज आवडला पण तुम्ही यायला हवे होते, वगैरे, वगैरे.गणेश, सागर, प्रीतम, विकास आदि विद्यार्थ्यांनि म्हणे तो वौइस् मेसेज सर्वाना वैयक्तिकरित्या ऐकवला. अभिषेक नि या फेयरवेल ला महटलेल्या गाण्याचे वीडियो पाठवले.
"ना
सीखा मैंने जीना जीना मेरे हमदम" हे गीत त्याच्या आवाजात ऐकताना एकदम मन 9-10 वर्ष जुन्या आठवणीत गेले. "जुदा हो के भी तू मुझ में कही बाकी है." ऎसे स्वर गळयातून निघाले आणि अख्खा ऑडियंसला जोरात टाळ्या वाजवायला आणि “माहोल” ऎसे ओरडायला लावणारा सारंग आठवला. ते सुद्धा गीत आतिफ नि म्हटलेले हे सुध्दा आतिफ नि म्हटलेले; तेव्हा सुध्दा त्या गीताची अशीच क्रेज होती आणि आता सुध्दा या गीताची अशीच क्रेज आहे. फरक फ़क्त हाच होता की तेव्हा आम्ही आमच्या गोल्डन डेज मधे होतो आणि आता गोल्डन मेमोरी आठवत जगतो. फरक हाच की ते गीत त्याने आम्ही फर्स्ट इयर ला असताना म्हटले होते आणि याने स्वताच्या फाइनल इयर ला फेयरवेल ला म्हटले.
मन
पुन्हा एकदा जी ई सी मधे हिंडायला गेले. जी ई सी म्हणजे गवर्नमेंट इंजीनियरिंग कॉलेज चंद्रपुर अर्थात शासकीय अभियांत्रिकी महाविद्यालय चंद्रपुर. आम्ही कॉलेज मधे असताना आयोजित केलेले फेयरवेल आठवले, आम्ही सहभागी झालेले फेयरवेल आठवले. काही कडु, काही तिखट काही अतिशय मधुर स्मृती जाग्या झाल्यात. आम्ही सेकंड इयर संपवत असताना आमचे नेरकर सर, अंसारी सर, गायधने सर, येवले सर आदि आम्हाला सोडून दुसरीकडे गेले तेव्हाचे प्रसंग आठवले. तेव्हा सुध्दा डोळे पानावनारे क्षण आठवले. आम्ही सेकंड इयर ला असताना आमच्या थर्ड इयर च्या सीनियर्स नि त्यांच्या सीनियर्स साठी आयोजित केलेल्या फेयरवेल ला आम्हाला बोलावले होते जेणेकरुन आम्हाला कल्पना यावी की असा सोहळा कश्या पद्धतीने आयोजित करावा. त्या सोहळयातील काही कडू गोड आठवणी ताज्या होताच मन बेचैन झाले.
आम्ही
थर्ड इयर ला असताना हेमंत आणि प्रदीप च्या नेतृत्वात आम्ही सर्वानी आयोजित केलेला फेयरवेल म्हणजे सर्वात मोठे आयोजन. उदय, विपिन, सागर, योगेश, स्वप्नील, सारंग, विशाल, मनोज नागेश, तृप्ति, टीना, पुजा यांच्यासह आमच्या पूर्ण वर्गाने नियोजनबध्द मेहनत घेऊन केलेला हां फेयरवेल म्हणजे उत्कृष्ट. सर्व काही चांगले असताना सुध्दा "मैं इतने पैसे नहीं दूंगा और मैं नही आऊंगा" ऐसे म्हणनारा एक वर्ग"भैय्या" आठवणी कडवट करून गेला परंतु आर्थिक परिस्थिति ठीक नसताना सुध्दा स्वताचे योगदान देणारा प्रकाश सर्वांच्या स्मृतिंमधे एक चिरकालीन छाप सोडून गेला.लज्जतदार जेवण आणि धडाकेबाज डी जे याने भारलेले वातावरण. विद्यार्थ्यांनि कॉलेज शी सदैव बांधीलकी जोपासावि ऎसे बोंगुलवार सरांचे भावनिक आवाहन आताही परत कॉलेज मधे जाऊन काही तरी चांगले करण्याची प्रेरणा देते. प्रत्तेक सीनियर ला मंचावर बोलवून त्याच्यावर काही तरी फिश पौंड मधील कमेंट, त्यावर त्याचे मत आणि मग त्याच्यासाठी एक स्पेशल गाणे आणि स्मृतिचिन्ह प्रदान करता करता सर्वांच्या डोळ्यातिल पाणी लपता लपत नव्हते.
कालपरत्वे आज
सर्व आपापल्या आयुष्यात व्यस्त झालेत, मी सुध्दा पॉलीला व्याख्याता म्हणून शिकवायला लागलो. पण मला रेलवे मधे नोकरी लागली आणि हा व्याख्याता म्हणून प्रवास थांबला. मात्र मी सोडून जाताना मला दिलेला फेयरवेल पुन्हा पुन्हा स्मृतिना आर्द्रता प्रदान करते. माझ्या विद्यार्थ्यांनि बाहेर हॉटेल मधे दिलेला फेयरवेल, काहिनी आणखी दुसऱ्या ठिकाणी आयोजित केलेला फेयरवेल, कॉलेज मधे आयोजित फेयरवेल, माझ्यावर जीवापाड प्रेम करणाऱ्या माझ्या मित्र सुयोग,संदीप, पंकज, जयंत, रोशन, संजय, स्वप्निल यांनी गुपचुप चारुन केलेला फेयरवेल, असे काही भावविवश करणारे क्षण मी जाताना अनुभवले.
फेयरवेल म्हणजे अंतिम निरोप नसतोच तो असतो शुभेच्छासह निरोप देण्याचा कार्यक्रम, आणि म्हणून निरोप समारंभाला "फेयरवेल" आणि अंतिम निरोपाला "फ्यूनरल" म्हणतात. मात्र हा निरोप चांगल्या पद्धतीने व्हावा हे आपल्या सर्वांच्याच हातामधे असतो. आपण किती चांगले क्षण सोबत घालवले, आपण किती माणुसकीने वागलो, आपण काय चाँगले करून निरोप घेत आहोत या सर्वांवर आपले फेयरवेल आणि फ्यूनरल दोन्ही आधारित असतात
.आणि
म्हणून जेवढे चांगले करता येणार तेवढे करण्याचा प्रयत्न करावा कारण आयुष्याच्या शेवटी पद, प्रतिष्ठा पैसा संपत्ति श्रीमंति काहीच सोबत जात नाही असे योगेश्वर श्रीकृष्णाने भगवदगीते मधे म्हटले आणि ते चिरंतन सत्य आहे. "यु ही पहलु में बैठे रहो, आज जाने की जिद ना करो" ऎसे म्हटले तरी थांबने शक्य नसते, आलेली वेळ कोणाला चूकवता येत नाही कारण "आनेवाला पल जानेवाला है". आणि म्हणून "हो सके तो इस में जिंदगी बिताले, पल जो ये जानेवाला है". असे गीतकार म्हणून गेलेत.
माझ्या नाशिबाने मला आतापर्यन्त अशा चांगल्या आठवणी देणारे अनेक मित्र, मार्गदर्शक, हितचिंतक भेटले. ज्यानी माझ्यासोबत नेहमी चांगलेच केले. ज्यानी स्वताच्या चांगुलपणाच्या वागणुकीतुन सदैव मला काही तरी चांगले करायची प्रेरणा दिली, सदैव देत असतात. ज्यानी फक्त निरोप घेतला आहे, शरीराने दूर आहेत, पण ज्यांच्या विचारांचा आणि आचारांचा पगडा माझ्या सोबत निरंतर चालत राहील अशा माझ्या सर्व प्रिय जनांना एवढेच म्हणावेसे वाटते की 'मी तुमची कधीच आठवण करत नाही, पण मला क्षणोक्षणी तुम्हा सर्वांची कमतरता जाणवते." आणि ही कमतरता पुन्हा आठवण करून देते ह्या हातातून निसटनाऱ्या क्षणांची..जैसे हे गीत आठवण करून देते
"इक बार
यु मिली मासूम सी कली
खिलते हुए कहा खुशवास मैं चली
.....
.......
थोड़ा सा हसा के थोड़ा सा रुलाके
पल जो ये जानेवाला है
आनेवाला पल जानेवाला है..!"
कोई टिप्पणी नहीं:
एक टिप्पणी भेजें