श्रद्धामय जीवनी - भगिनी निवेदिता
“या देवी सर्वभूतेषु श्रध्दारूपेण संस्थितः
नमस्तस्यै नमस्तस्यै नमस्तस्यै नमो नमः !”
अर्थात :- सर्व जीवांमध्ये श्रध्देच्या रुपात स्थापित देवी तुला नमस्कार असो.!
अर्थात :- सर्व जीवांमध्ये श्रध्देच्या रुपात स्थापित देवी तुला नमस्कार असो.!
"आपल जीवित कार्य भारत आहे. भारताला आपली गरज आहे! आपण ब्रिटन मधून इथं भारतात येऊन सेवा करावी!"
ह्या आशयाचे पत्र भारतातील एका हिंदू गुरूने आपल्या एका विदेशी शिष्येला लिहिलं.
आणि ह्या पत्रानंतर सन १८९८ ह्या वर्षी एक अभूतपूर्व अशी घटना घडली ज्यामुळे संपूर्ण भारतवर्षाला एक अनोखी भेट लाभली. मी तर म्हणेन भारत मातेला खूकी लाभली. (खूकी ह्या बंगाली शब्दाचा अर्थ होतो लहान मुलगी). ही अनोखी भेट म्हणजे ‘मार्गारेट एलिझाबेथ नोबल’ आणि ज्या महान व्यक्तीमुळे ही महिला भारताला लाभली ती महान व्यक्ती म्हणजे ‘स्वामी विवेकानंद’.
आणि ह्या पत्रानंतर सन १८९८ ह्या वर्षी एक अभूतपूर्व अशी घटना घडली ज्यामुळे संपूर्ण भारतवर्षाला एक अनोखी भेट लाभली. मी तर म्हणेन भारत मातेला खूकी लाभली. (खूकी ह्या बंगाली शब्दाचा अर्थ होतो लहान मुलगी). ही अनोखी भेट म्हणजे ‘मार्गारेट एलिझाबेथ नोबल’ आणि ज्या महान व्यक्तीमुळे ही महिला भारताला लाभली ती महान व्यक्ती म्हणजे ‘स्वामी विवेकानंद’.
“माझ्या अमेरिकेन बंधु-भगिनींनो” ह्या एका वाक्यासारशी दिग्विजय करणाऱ्या स्वामी विवेकानंदांनी अमेरिकेत जागतिक धर्मपरिषदेत हिंदुत्वाच्या तत्वचिंतनाचं दर्शन साऱ्या जगाला घडवलं होतं. त्यानंतर युरोपात सुद्धा भारतीय दर्शन शास्त्र, हिंदू जीवन पद्धती, वेदांत ह्यावर व्याख्यान द्यायला स्वामीजी गेले होते. तिथं त्यांच्या लंडन येथील एका शिष्याच्या घरी पहिल्यांदा मार्गारेट नोबल ह्यांनी स्वामी विवेकानंदांना वेदांतावर बोलतांना ऐकलं आणि त्या क्षणापासून त्यांनी स्वामी विवेकानंद ह्यांना आपलं श्रद्धास्थान बनवलं.
जन्माने आयरिश असलेली मार्गारेट बालपणापासूनच अध्यात्मिक प्रवृत्तीची होती. तिने ख्रिस्ती तत्वज्ञान ह्याचा अभ्यास केला होता. नंतर तिला बरीच प्रश्न पडायचीत. त्यांचं समाधान न होऊ शकल्याने तिने नंतर विज्ञानाच्या साहाय्याने आपल्या प्रश्नांना उत्तरे शोधण्याचा प्रयत्न केला. मात्र हृदयातील अस्वस्थता काही केल्या कमी होत नव्हती. शेवटी जगाला शांती व करुणेचा संदेश देणाऱ्या प्रज्ञासूर्य तथागत गौतम बुध्दांच्या तत्वज्ञानाचा त्यांच्यावर प्रभाव पडला व त्यानंतर त्या भारतीय तत्वज्ञान, भारतीय जीवन दर्शन ह्याकडे झुकायला लागल्यात.
स्वामीजींच्या भेटीने तर त्यांच्या वैचारिक अस्वस्थतेला जणू कायमची स्वस्थता लाभली. स्वामीजींनी त्यांच्यावर हिंदू धर्मातील विश्वामांगल्य चिंतन करणाऱ्या विचारांचे संस्कार केलेत. त्यानंतर त्यांची श्रद्धा हिंदुत्व, भारतभूमी व स्वामीजी ह्यांच्याविषयी अधिकाधिक दृढ होत गेली.
१८९८ ला आपला देश सोडून मार्गारेट आपल्या गुरूंच्या आवाहनाला प्रतिसाद देत इथं भारतात आल्यात व त्यांना स्वामीजींनी नाव दिलं ‘भगिनी निवेदिता’. करुणामय गौतम बुद्धाच्या मार्गावरून चालत ह्या भारतातील दीन दुबळ्या गरीब जनतेच्या कल्याणासाठी आजन्म काम करण्याची प्रतिज्ञा त्यांना विवेकानंदांनी दिली. त्यांनी ती स्वेच्छेने स्वीकारली सुद्धा व लागलीच कार्याला सुरुवात सुद्धा केली. कलकत्ता येथे मुलींना शिक्षण द्यायला शाळा काढली जे त्याकाळी अत्यावश्यक होते. रामकृष्ण मठाच्या कार्यात सुद्धा त्यांनी सक्रिय सहभाग घेतला. बंगालात पसरलेल्या महामारीच्या काळात आपल्या गुरुबंधूंसोबत त्यांनी रूग्णसेवेचं कठीण व्रत केलं. त्यांनी भारतीय संस्कृती, हिंदू तत्वज्ञान, गौतम बुद्ध, महादेव, स्वामी विवेकानंद ह्यांच्याविषयी विपुल लेखन केलेलं आहे.
भारतीय संस्कृती दर्शन करणाऱ्या त्यांच्या पुस्तकातील लिखाण वाचलं तर निश्चितच दिसून पडतं की त्यांची भारतावर विलक्षण श्रध्दा होती. आणि त्याच श्रद्धेपोटी त्यांनी भारतात आपला सेवाकार्याचा पसारा उभारला होता. अप्रत्यक्ष कार्यरत राहून भारतातील स्वतंत्रता चळवळीसाठी जागृती केली.
पश्चिमेकडील एका देशातील एक तरुणी आपल्या गुरूच्या आवाहनाला सकारात्मक प्रतिसाद देत भारतात येते काय, आणि इथं आल्यावर पूर्णपणे भारतीय होऊन शेवटच्या श्वासापर्यंत ह्या देशाच्या कल्याणासाठी झोकून देते काय! सारंच विलक्षण व अचंबित करणारं!
हिंदूंची आपल्या देवी देवतांवर, आपल्या संस्कृतीवर अलौकिक श्रद्धा आहे, जी मुळापासूनच बळकट आहे त्यामुळे हजारो वर्षांच्या आक्रमणानंतरही एवढ्या उत्साहाने आजही आम्ही सगळी सण उत्सव साजरा करतो. नवरात्रीच्या उत्सवाचेच उदाहरण घ्या. आपली जन्मभूमी सोडून भारतात येऊन सेवाकार्ये करण्यात काहीही छुपा उद्देश्य नसणाऱ्या भगिनी निवेदिता यांच्या जीवनाचं सार जर काढलं तर एवढंच लक्षात येईल की त्यांनी जे काही केलं ते भारतावरील, हिंदू जीवन दर्शनावरील आणि आपले गुरू स्वामी विवेकानंद ह्यांच्यावरील श्रद्धा ह्यांच्यामुळेच.!
आज पाचव्या दिवशी श्रद्धा बळकटीकरण करणाऱ्या खऱ्या खुऱ्या सिस्टरला अर्थात भगिनी निवेदिता ह्यांना कृतज्ञ भावाने नमन!
“राष्ट्राचं पुनर्निर्माण त्याच्या आदर्शांच्या पुनर्निर्माणाशिवाय अशक्य आहे!” - भगिनी निवेदिता
कोई टिप्पणी नहीं:
एक टिप्पणी भेजें