भक्तीचं अनुपम सौंदर्य- संत कान्होपात्रा
“या देवी सर्वभूतेषु भक्तिरूपेण संस्थितः
नमस्तस्यै नमस्तस्यै नमस्तस्यै नमो नमः! ”
अर्थात- सर्व प्राण्यांमध्ये भक्तीरूपात वसत असलेल्या देवी नमस्कार असो.!
साधारणतः पंधराव्या शतकातील ही गोष्ट आहे. तेव्हा भारतात सगळीकडे इस्लामी शासकांचे राज्य होते! विठ्ठलाच्या पंढरपूर जवळील एका गाव मंगळवेढा. त्या गावातील एका देहविक्रय करणाऱ्या गणिकेच्या पोटी जन्माला आलेल्या सुंदर, आकर्षक असलेल्या एका मुलीने आपल्याच घरातून पलायन केले व ती थेट निघाली पंढरपूरच्या विठुरायाच्या मार्गावर.
झाले असे की ही मुलगी सुंदर जरी असली तरी तिला सौंदर्यासोबतच विचारक्षमता लाभली होती. मात्र सगळीकडे तिच्या अप्सरांशी तुलना होणाऱ्या रुपाचीच ख्याती जास्त पसरायला लागली. त्यात जन्मदात्री आई व्यवसायाने गणिका होती; वडील कोण ते माहिती नाही.?
त्यामुळे साहजिकच वासनांध पुरुषांच्या दृष्टीने ती सुद्धा उपभोग्य वस्तूच समजल्या जात होती. आईच्या व्यवसायामुळे ती साहजिकच बालपणीच नृत्य व गायन ह्या कलांमध्ये निपुण झाली. मात्र जशी जशी ती मोठी व्हायला लागली तशी पुरुषांच्या विखारी नजरा तिच्यावर पडू लागल्यात. तिला मात्र ह्या नृत्य गायन करून आई सारखं गणिका म्हणून आयुष्य कंठण्यात काहीही रस नव्हता. तिला स्वतःच्या जीवनाबद्दल बरेच प्रश्न पडायचे ज्याची उत्तर शोधायचा प्रयत्न ती करायची. तिला बालपणापासून पंढरीच्या विठ्ठलाची ओढ होती. एके दिवशी तिच्या आईने गावातील एका प्रतिष्ठित व्यक्तीच्या समोर त्या सुंदर मुलीच्या नृत्य गायनाचा कार्यक्रम ठरवला. मात्र हे तिला
मंजूर नव्हतं, म्हणून तिने घरातून पलायन केले.
ह्या पलायन करणाऱ्या भक्तिदायी सुंदरीचे नाव होते कान्होपात्रा, होय संत कान्होपात्रा. महाराष्ट्राच्या संत परंपरेतील एक अतिशय महत्वाची महिला संत.
घरून सुटका केल्यानंतर जेव्हा कान्होपात्रा रस्त्याने निघाल्या त्यांना वाटेत पंढरपूर ला जाणारे वारकरी भेटले. त्या वारकऱ्यांशी झालेल्या संभाषणानंतर त्यांना असे पुरेपूर पटलं की आता आपल्या ह्या अश्या आयुष्याचं आणि त्यातील सगळ्या प्रश्नांची उत्तरे फक्त पंढरीचा विठोबाच देऊ शकतो. आणि त्या सुद्धा त्या वारकऱ्यांच्या सोबत निघाल्या पंढरीला. मुळातच विठ्ठल भक्तीची रुजवण अंतरात असल्याने त्यांनी पंढरपुरात विठ्ठल रुक्मिणी मंदिरात येऊन आपलं भक्तीकार्य पूर्णकालीन करायचं सुरू केलं. त्या रोज मंदिराची झाडलोट करणं, विठ्ठलावरील आपली भक्ती प्रकट करणारी भजने गाणं, आदि कार्ये करू लागल्या. त्यांनी अनेक अभंग, ओव्या रचल्या.
"अगा वैकुंठीच्या राया । जगा विठ्ठल सखया ।
.
.
जगा रखुमाईच्या कांता । कान्होपात्रा दासी आता ।"
.
.
जगा रखुमाईच्या कांता । कान्होपात्रा दासी आता ।"
ह्या त्यांच्या प्रसिद्ध अभंगातून त्यांची विठ्ठल भक्ती व विठ्ठलाप्रति समर्पण भाव प्रकट होतो.
मात्र म्हणतात ना की कधीकधी सौंदर्य श्राप ठरतो. तसेच कान्होपात्रा यांच्या बाबतीत झालं. त्यांच्या भक्तीची भुरळ पडण्या ऐवजी त्यांच्या सौंदर्याची भुरळ पडून आसक्त झालेला बिदर चा इस्लामी बादशाह याने त्यांना आपली उपपत्नी बनवण्याचा मनसुबा रचला. मात्र विठ्ठलाशी एकरूप झालेल्या कान्होपात्रा यांना हे अमान्य होत. त्यामुळे ह्या बादशहाच्या हाती सापडून आपल्या देहाची विटंबना होण्यापेक्षा आपण ह्या पांडुरंगाच्या चरणी स्वतःला अर्पण करून देऊ ह्या प्राणांतिक भावनेने त्या पांडुरंग विठ्ठलाला आर्जव करतात.
मात्र म्हणतात ना की कधीकधी सौंदर्य श्राप ठरतो. तसेच कान्होपात्रा यांच्या बाबतीत झालं. त्यांच्या भक्तीची भुरळ पडण्या ऐवजी त्यांच्या सौंदर्याची भुरळ पडून आसक्त झालेला बिदर चा इस्लामी बादशाह याने त्यांना आपली उपपत्नी बनवण्याचा मनसुबा रचला. मात्र विठ्ठलाशी एकरूप झालेल्या कान्होपात्रा यांना हे अमान्य होत. त्यामुळे ह्या बादशहाच्या हाती सापडून आपल्या देहाची विटंबना होण्यापेक्षा आपण ह्या पांडुरंगाच्या चरणी स्वतःला अर्पण करून देऊ ह्या प्राणांतिक भावनेने त्या पांडुरंग विठ्ठलाला आर्जव करतात.
"नको देवराया अंत पाहू आता । प्राण हा सर्वथा जाऊ पाहे ।
हरिणीचे पाडस व्याघ्रे धरियले । मजलागी जाहले तैसे देवा ।"
हरिणीचे पाडस व्याघ्रे धरियले । मजलागी जाहले तैसे देवा ।"
आणि ज्यावेळी त्यांना असं वाटतं की आता आपल्या अंतानेच सगळी प्रश्न सुटतील त्यावेळी त्या आर्त हृदयाने देवाची परवानगी घेऊन त्याच्या चरणीच प्राणत्याग करतात.
"मोकलुनी आस, जाहले उदास ।
घेई कान्होपात्रेस हृदयात ।"
शेवटी कान्होपात्रा काय आणि त्यांची समकालीन संत मीराबाई काय दोघीही भक्तिरसात आकंठ बुडालेल्या. मात्र समाजाला ह्यांची हेटाळणी करावीशी वाटली, त्यांना त्रासच द्यावासा वाटलं, मात्र भक्तिमार्गावरील कंटकांना सुमन समजून शेवटच्या श्वासापर्यंत समाजाला मार्गदर्शन करणाऱ्या ह्या महान महिला आजही त्यांच्या अभंग, ओव्यांच्या रूपाने चिरंजीव आहेत. मुळात भक्ती हेच त्यांच्या अनुपम सौंदर्याचं बलस्थान.!
नवरात्रीचा चौथा दिवस, एव्हाना देवीच्या भक्तीला जोर चढलेला आहे. आज ह्या चौथ्या रात्री महान संत कान्होपात्रा आणि संत मीराबाई ह्यांना भक्तिमय अभिवादन.!
“वर्म वैरियाचे हाती। देऊ नको श्रीपती।
तू तो अनाथाचा नाथ। दीन दयाळ कृपावंत।
वेद पुराणे गर्जती। साही शास्त्रे विवादती।
चरणी ब्रीद वागविसी। तुझी कान्होपात्रा दासी।"
तू तो अनाथाचा नाथ। दीन दयाळ कृपावंत।
वेद पुराणे गर्जती। साही शास्त्रे विवादती।
चरणी ब्रीद वागविसी। तुझी कान्होपात्रा दासी।"
अप्रतिम सर
जवाब देंहटाएंKhupch chan💐
जवाब देंहटाएंव्वा ... आमचाच ज्ञानेश.
जवाब देंहटाएंनको देवराया खुप वेळा ऐकलं पण हे कान्होपात्रांची रचना आहे हे माहीत नव्हते.
खूप छान.... ं
Very nice😊👍👌💐
जवाब देंहटाएंखूप छान 👌
जवाब देंहटाएंखूप सुंदर माऊली...
जवाब देंहटाएं