रविवार, 6 अगस्त 2017

मित्र म्हणजे हक

         "मित्र म्हणजे...अमुक...मित्र म्हणजे तमुक....." असं कोणी कितीही फिलॉसॉफी झाडली.. तरी मित्र म्हणजे हरामखोर, कमीना (हक) आणि तरीही कायमच हवाहवासा वाटणारा निर्बुद्ध जीव अशीच आपली व्याख्या..
          ह्यांच बोलणं म्हणजे एवढं सोज्ज्वळ की सेन्सॉर बोर्ड ला सुद्धा एवढे बीप बीप टाकावं लागतील की संवादाच्या ऐवजी निव्वळ पिपाणी ऐकू यायची. यांच्या बोलण्याचे विषय आणि त्यांची व्याप्ती एवढी की खोली, उंची, मोजून त्याला कोणत्या ग्रेड मध्ये मान्यता द्यायची याचा विचार करतांना आदरणीय पहलाज काका निहलानी स्वतः पदत्याग करतील.
          काही फक्त वापर करून घेणारे जरी असले तरी स्वतःचा हक्काने वापर करू देणारे बरेच..!
तऱ्हे तऱ्हेचे तऱ्हेवाईक आणि चटपटीत मसालेदार मासलेवाईक अशे विभिन्न प्रकृतीचे हे सर्व.
काही कायमच दुसऱ्यांना गिऱ्हाईक करण्यात धन्यता मानणारे काही नेहमी गिऱ्हाईक होण्यात आनंद मानणारे. रस्त्यावरील अरबट चरबट खाद्यपदार्थ जे कधी प्रकृतीला त्रास देतील अशे काही (मुलींच्या पायातील पादुकांचा आशीर्वाद यांच्यामुळे प्राप्त होण्याची शक्यता जास्तच..)
         काही साक्षात श्रीकृष्णाने अर्जुनास भगवदगीता सांगावी तशे उपदेश देणारे तर काही सिनेमॅटोग्राफर स्टाईल ने उभे करून पोज द्यायला लावणारे. सदा रडत असणारे जशे 'विषाद योगाचं' अनुभव घडवतात तसेच काही सदा न कदा 'हास्ययोग' घडवत असतात (या हास्ययोगात मांसाहारी विनोदायाम जास्त असतात हा भाग अलाहिदा).
           कधी वेळेवर कॉल न घेणारे, मेसेज ला वेळेवर रिप्लाय न देणारे परंतु आणिबाणीच्या प्रसंगी खंबीरपणे उभे राहणारे (म्हणजे एवढे खंबीर की जर साधा ताप जरी आला तरी तोपर्यंत साथ सोडणार नाही जोपर्यंत ताप जाणार नाही. कदाचित गचकला तर परत यायला नको याची खात्री घेत असतील..? )
           काही स्पेशल मूवी मित्र ज्यांना आपल्याच सोबत नवीन मूवी चा फर्स्ट डे लास्ट शो बघायचा असतो. (हा भाग वेगळा की लग्नासाठी मुलगी बघायला जायच्या वेळेला हे नेमके मित्राला एकटाच पाठवणार..तेव्हा बरोबर कन्नी कापणार)
           असो शेवटी जेवढं मन मोठं तेवढा मित्र परिवार मोठा. (आम्ही खिश्यालाच मन मानतो ही सुचना.) नानाविध प्रकारचे हे जिन्नस मिळून आयुष्याची भेळ झालेली आहे. आणि भेळेचा आणि ठसक्याचा संबंध जास्तच. खऱ्या मित्राचा आदर्श घेण्यासारख्या योगेश्वर श्रीकृष्णाने नाही काय सर्व प्रकारच्या, सर्व चवीच्या पदार्थांचा एकच गोपाळकाला यामुनातीरी केला होता. तसाच या मित्रमंडळींचा गोपाळकाला या वाहत्या जीवन प्रवाहाच्या तटावर होत असतो.
           त्या सर्वांना आठवणे, त्यांचा सन्मान करणं (तो तर खरे मित्र करत नाहीतच, उलट जेवढा जास्त अपमान तेवढी पक्क्की मैत्री) त्यांचं महत्व अबाधित ठेवणं हे आपलं कर्तव्य ( कारण "उपकार थोडी करून राह्यला बे.!" हे वाक्य सदैव ऐकवून कर्तव्यतत्पर राहायला हेच भाग पाडतात) त्यामुळे कर्तव्यच. ह्या कर्तव्याची जाणीव व्हावी म्हणून सर्वांना मैत्रिदिनाच्या शुभेच्छा. ( मुळात शुभेच्छा दिल्या म्हणून 'जास्त फ्लॅश मारून राहिलास का आता, आम्हाले *** शिकवते का?' असले बोलणे खावेच लागेल, पण तरीही हिम्मत करतोच.
           जो जसा आहे त्याला स्वीकारणं आणि स्वतः न बदलता त्याला सांभाळणं (ह्याचा अर्थ त्याला ऊर फुटेस्तोवर शिव्यांची लाखोली वाहणे असाच ) हे खरं आयुष्य.!
आणि म्हणून मित्राची व्याख्या एका शब्दात करा म्हटलं तर एवढंच म्हणीन मित्र म्हणजे आयुष्य..!

मंगलवार, 14 फ़रवरी 2017

ती सध्या काय करते.?

                    ती सध्या काय करते.?” हा प्रश्न सहजच मनात उपस्थित राहिलागोरेपान रंग प्राप्त झालेली ती, सहज सुंदर दिसत असेल कधीतरीकधी काळी लांबसडक काळे केस असतील तिचे.! अतिशय लाडा कोडात वाढलेली गावातील पाटलाची पोर तीशेकडो एकर जमिनीचे मालक तिचे जन्मदातेआणि वारश्याने तिच्या वाट्याला आलेली ती जमीन आणि तो मोठा वाडाएकदम कडक स्वभावाची तीबऱ्याचदा कठोर बोलणारी..आणि तरीही सर्वांना आपल्याभोवती गोळा करून ठेवण्याची सिद्धी तिला होतीमला सुरुवातीला याच भारी आश्चर्य वाटायचं पण जसं जसं माझी समज वाढली तसं त्यामागचं कारण सुद्धा मला कळलं आणि त्याच बरोबर वाईट पण वाटलं!
          कधी कधी जी माहिती मिळायची त्यावरून मला रागही यायचा तिच्या वागणुकीचा पण प्रेम कमी होत नव्हतंपण एक दिवस हाच प्रश्न मनात डोकावला "ती सध्या काय करते.?" आणि दुर्दैव म्हणजे त्याच्याच दुसऱ्या दिवशी दुपारी बहिणीचा मेसेज आला "ती गेली."
          कधी नव्हे ते नेमक्या त्याच रविवारी मी नोकरीशी निगडित कामाने "ऑन ड्युटीबाहेर होतोमनात प्रचंड चलबिचल सुरु झाली, "काय करावे?" काही समजत नव्हतेगेल्या दोन-तीन वर्षात तिच्या भेटीलासुद्धा गेलो नव्हतो मीबऱ्याचदा मनात आलं होतं की एकदा भेटून यावं तिलापण काही ना काही कारणाने राहिलंच भेटणंआणि आता अशी दुर्दैवी बातमीतसं बातमी अनपेक्षित नव्हतीतिची तब्बेत तशीच झालेली होतीत्यामुळे आज ना उद्या काही काळाने ती जाणारंच हे सर्वांनी गृहीत धरलेच होतंपण अशी शेवटची भेट  होता ती कायमची निघून जाईल हे ध्यानी मनी नव्हतेच मुळी माझ्या.
            मी ड्युटी वर असल्यामुळे मित्राला कॉल करून ताबडतोब ट्रेनच्या तिकिटाच्या उप्लब्धतेबद्दल विचारलंत्वरित वरिष्ठांना बोलून निघायला हवं आणि मिळेल त्या ट्रेन ने तिच्या अंत्यविधीला तरी जावं याच विचारात असतांना परत बहिणीचा मेसेज आला की "चुकीची बातमी आली होती". थोडं चेहऱ्यावर हास्य आलेमी परत आपल्या कामाच्या धावपळीत मग्न झालो.
            पण ज्याप्रमाणे फुलपाखरांचे आयुष्य क्षणभंगुर असते तसंच माझ्या या आनंदाचं झालंएका तासाने परत बहिणीने कॉल केलाम्हटलं,"ती गेली!"
            अश्यावेळी बातमी आली की मी निघू शकत नव्हतोआणि निघालो असतो तरी तिचं अंतिम दर्शन मात्र झालं नसतं कारण तिच्यावर हक्क सांगणाऱ्यांनी अंतिम संस्कार दुसऱ्या दिवशी सकाळीच आटोपायचं ठरवलं होतं.
            मनातल्या मनात तिला नमस्कार केलापरमपिता परमेश्वराला हात जोडून विनंती केली की तिला मोक्ष लाभू दे.
आठवडा भरानंतर:-
           "ती गेलीपण आता पुढे कायपुढल्या विधींच काय.? दशक्रिया विधीतेरावं कधी कुठं करणार आहेत?" मी हे जाणण्याचा प्रयत्न केला तेव्हा तर मला धक्काच बसलातिच्या जिवंतपणी जो प्रकार तिने बघितलातो प्रकार तिच्या मृत्यूनंतर तरी सम्पेल ही आमची आशा फोल ठरली.
           तिच्या जिवंतपणी तिच्या संपत्तीसाठी आपापसात भांडणारी तिची मुलं आज ती मेल्यानंतरही एक झालेली नव्हतीज्या मुलांना तिने आपल्या वडिलोपार्जित संपत्तीचा भाग मुक्तहस्ते वाटला होता त्यांनी फक्त जमिनीच्या तुकडा आपल्या नावे करून घ्यायसाठी तिला एकमेकांकडे फिरवलं होतंआणि खेद म्हणजे आजही तिच्या मृत्यूनंतर तिला एकमेकांकडे वाटून घेत होते.
           भावंडांनी दोन वेगवेगळे अस्थिविसर्जन वेगवेगळ्या तीर्थक्षेत्री करायचं ठरवलंदोन वेगवेगळ्या दशक्रिया विधीवेगवेगळ्या ठिकाणी तेराव्याचं जेवण ठरवण्यात आलंका.? मायेवर कोणाचं प्रेम जास्त आहे ते दाखवण्यासाठी की स्वतःचा अहंकार जपण्यासाठीतिच्या मनावरगुणांवरसंस्कारांवर कोणी हक्क सांगितला नाही मात्र संपत्तीवर सांगितला.
          शेवटी माझ्यासारख्या तिच्या हतबल नातवांना हाच प्रश्न पडतो, "ती सध्या काय करते.?" 
             आणि उत्तर हेच कीती सध्या भावंडांच्या यादवीत दोन दोन अस्थिकलशांत राहतेजीवनाचं अंतिम सत्य प्रकट रुपाने मांडतेते सत्य जे गझलसम्राट सुरेश भटांनी स्वतःच्या शब्दांत मांडलंय
         "इतुकेच मला जातांना सरणावर कळले होते
            मरण्याने केली सुटकाजगण्याने छळले होते.!" 

रविवार, 11 दिसंबर 2016

दिवस-वाढीचा

"भाऊ, हैप्पी बर्थडे इन ऍडव्हान्स" इथपासून सुरु झालेल्या शुभेच्छा अजूनही संपलेल्या नाहीत..पण वाढदिवस संपून दुसरा दिवस संपत चाललाय..!
माझ्यापेक्षा वयाने, मानाने, अनुभवाने जेष्ठ श्रेष्ठ अशा व्यक्तींपासून तर वयाने छोट्या पण मला कळत नकळत बरंच काही शिकवणाऱ्या शेकडो मित्रांचे शुभेच्छा संदेश आलेत..!
कोणी कॉल करून, तर कोणी व्हाट्सअप कोणी hike तर कोणी फेसबुक चा वापर करून, शुभेच्छा दिल्यात..!
थोडाफार आऊटडेटेड झालेला टेक्स्ट एस एम एस चा सुद्धा वापर बऱ्याच जणांनी केला..!
खरं तर माझ्यावर लोकांनी एवढी माया करावी, एवढं प्रेम करावं या पात्रतेचा मी निश्चित नाही..पण तरीही एवढ्या प्रचंड अशा स्नेह वर्षावात मी भिजून गेलो..!
ह्यात असली गंमत हि आहे की आपण माझ्या गुण दोषांसकट मला स्वीकारलं(गुण नाहीच सर्व दोषच..)...
मला आपण सर्व आपलं मानून सहन करता त्यावर आर रहमान यांनी गायलेले "रहना तू" हे गाणं आठवलं त्यातील प्रसून जोशींनी लिहिलेल्या या ओळी मला खूप आवडतात
" हाथ थाम चलना हो
तो दोनो के दाये हाथ संग कैसे..
एक दाया होगा
एक बाया होगा
थाम ले
हाथ ये थाम ले
रहना तू..
है जैसा तू..
थोडा सा दर्द तू..
थोडा सा सुकू..
रहना तू है जैसा तू..
धीमा धीमा झोका
या फिर जूनु
थोडा सा रेशम..तू हमदम..
थोडा सा खुरदुरा..
कभी तू अड जाये..
कभी तू लड जाये..
तुझे चाहू जैसा है तू..!"
कदाचित तुम्ही सर्वांनी हे गाणं ऐकूनच माझ्या सारख्या अश्या आयटम ला असे सहन करायचं ठरवलं असेल..!
मी वाढदिवशी रक्तदान करतो, किंवा अजून काही छोटासा सामाजिक उपक्रम केला म्हणून कौतुक करणारे बरेच आहेत..पण यासाठी सुद्धा आपल्यापैकी अनेक जण कारणीभूत आहेत जे स्वतःच्या जीवनातून असा आदर्श घालून देतात आणि मग आमच्यासारखे व्यक्ती अश्या उपक्रमांना आपल्या आयुष्यात परिपाठ बनवतात.!
मला असली सामाजिक प्रेरणा देणाऱ्या अशा असंख्य ज्ञात अज्ञात व्यक्तींना धन्यवाद; तुमच्यामुळे मला प्रेरणा भेटली आणि माझं उगाच कौतुक..(कारण आमचं म्हणजे उगाच फ्लॅशबाजी)
हा वाढदिवस म्हणजे दिवस-वाढीचा.! माझ्या आयुष्यात आपल्या शुभेच्छा, मार्गदर्शन नित्य वाढू द्यात, जेणेकरून माझ्या वाक्तित्वाचा विकास होईल. वाढत्या वयाबरोबर वाढणाऱ्या दायित्वांना समर्थपणे पार पाडण्यासाठी आपल्या सहकार्याची, आपल्या मार्गदर्शनाची नितांत गरज आहे. हे जसे वाढत जाईल तसे माझा वाढदिवस यशस्वी होत जाईल.!
हे दिवस वाढीचा आनंदी असाच होण्यासाठी आपले ऋणानुबंध दिवसेंदिवस वृद्धिंगत होऊ द्या. हे संबंध अंतिम श्वासाच्या पार असू द्या याच विनंतीने आपणा सर्वांना धन्यवाद देतो. आपण असेच प्रेम आशीर्वाद असू द्या; हा माझा नश्वर देह राष्टरकार्यास्तव पडावा आणि भारत मातेच्या सेवेत खारीचा वाटा मोठा व्हावा हीच सदिच्छा.!
जाता जाता अमित त्रिवेदी यांनी गायलेलं एक गाणं-"मांजा", आठवलं , स्वानंद किरकिरे यांनी लिहिलेल्या या ओळी अप्रतिम आहेत..
चला मी ऐकतो ते गाणं..माझ स्वतःलाच बर्थडे गिफ्ट..!
"रिश्ते पंखों को हवा देंगे..
रिश्ते दर्द को दवा देंगे..
जीत कभी हार कभी
गम तो यारो दो पल के होंगे मेहमान..!
रिश्ते दहलीजें भी लाँघेंगे..
रिश्ते लहू भी तो मांगेगे..
आँसू कभी मोती कभी
जाँन भी मांगो यारो कर देंगे कुर्बान..!

रुठे ख्वाबो को मना लेंगे..
कटी पतंगो को थामेंगे..
सोयी तकदिरे जगा देंगे..
कल को अंबर भी झुका देंगे..
है जज्बा..
सुलझा लेंगे उलझे रिश्तों का मांझा..!"


धन्यवाद.!