मंगलवार, 7 अप्रैल 2015

फेयरवेल आणि मी


                   "फेयरवेल आहे सर. काही ही करा पण उद्या या.!", काही दिवसांअगोदर माझ्या विद्यार्थ्यांचा कॉल आला होता तेव्हा त्यानी बोललेले ही वाकये. मी रेलवे ला जॉइन व्हायच्या आधी एक अभ्यागत व्याख्याता म्हणून शिकवायला जायचो, तेथील द्वितीय वर्षाच्या विद्यार्थ्यांनी अंतिम वर्षाच्या आपल्या मित्रांसाठी निरोप समारंभ म्हणजेच फेयरवेल चा कार्यक्रम आयोजित केला होता. या कार्यक्रमात मी सुध्दा राहावे म्हणून मला आमंत्रण द्यायला आयोजन करणाऱ्या विद्यार्थ्याचा कॉल आला. पण त्यानी कॉल केला तेव्हा बराच उशीर झाला होता, त्यामुळे लगेच दुसऱ्या दिवशी सकाळच्या या कार्यक्रमाला पोहोचने अशक्य होते. मी त्यांना नम्रपणे माझी असमर्थता दर्शवली, माझ्या शुभेच्छा दिल्या आणि एक माझ्या आवाजातील सन्देश व्हाट्सअप वर पाठवून दिला. कार्यक्रम आटोपला आणि मग बऱ्याच विद्यार्थी मित्रांचे मेसेज, कॉल आले की आम्हाला तुमच मेसेज आवडला पण तुम्ही यायला हवे होते, वगैरे, वगैरे.गणेश, सागर, प्रीतम, विकास आदि विद्यार्थ्यांनि म्हणे तो वौइस् मेसेज सर्वाना वैयक्तिकरित्या ऐकवला. अभिषेक नि या फेयरवेल ला महटलेल्या गाण्याचे वीडियो पाठवले.
                   "ना सीखा मैंने जीना जीना मेरे हमदम" हे गीत त्याच्या आवाजात ऐकताना एकदम मन 9-10 वर्ष जुन्या आठवणीत गेले. "जुदा हो के भी तू मुझ में कही बाकी है." ऎसे स्वर गळयातून निघाले आणि अख्खा ऑडियंसला जोरात टाळ्या वाजवायला आणिमाहोलऎसे ओरडायला लावणारा सारंग आठवला. ते सुद्धा गीत आतिफ नि म्हटलेले हे सुध्दा आतिफ नि म्हटलेले; तेव्हा सुध्दा त्या गीताची अशीच क्रेज होती आणि आता सुध्दा या गीताची अशीच क्रेज आहे. फरक फ़क्त हाच होता की तेव्हा आम्ही आमच्या गोल्डन डेज मधे होतो आणि आता गोल्डन मेमोरी आठवत जगतो. फरक हाच की ते गीत त्याने आम्ही फर्स्ट इयर ला असताना म्हटले होते आणि याने स्वताच्या फाइनल इयर ला फेयरवेल ला म्हटले.
                  मन पुन्हा एकदा जी सी मधे हिंडायला गेले. जी सी म्हणजे गवर्नमेंट इंजीनियरिंग कॉलेज चंद्रपुर अर्थात शासकीय अभियांत्रिकी महाविद्यालय चंद्रपुर. आम्ही कॉलेज मधे असताना आयोजित केलेले फेयरवेल आठवले, आम्ही सहभागी झालेले फेयरवेल आठवले. काही कडु, काही तिखट काही अतिशय मधुर स्मृती जाग्या झाल्यात. आम्ही सेकंड इयर संपवत असताना आमचे नेरकर सर, अंसारी सर, गायधने सर, येवले सर आदि आम्हाला सोडून दुसरीकडे गेले तेव्हाचे प्रसंग आठवले. तेव्हा सुध्दा डोळे पानावनारे क्षण आठवले. आम्ही सेकंड इयर ला असताना आमच्या थर्ड इयर च्या सीनियर्स नि त्यांच्या सीनियर्स साठी आयोजित केलेल्या फेयरवेल ला आम्हाला बोलावले होते जेणेकरुन आम्हाला कल्पना यावी की असा सोहळा कश्या पद्धतीने आयोजित करावा. त्या सोहळयातील काही कडू गोड आठवणी ताज्या होताच मन बेचैन झाले.


                  आम्ही थर्ड इयर ला असताना हेमंत आणि प्रदीप च्या नेतृत्वात आम्ही सर्वानी आयोजित केलेला फेयरवेल म्हणजे सर्वात मोठे आयोजन. उदय, विपिन, सागर, योगेश, स्वप्नील, सारंग, विशाल, मनोज नागेश, तृप्ति, टीना, पुजा यांच्यासह आमच्या पूर्ण वर्गाने नियोजनबध्द मेहनत घेऊन केलेला हां फेयरवेल म्हणजे उत्कृष्ट. सर्व काही चांगले असताना सुध्दा "मैं इतने पैसे नहीं दूंगा और मैं नही आऊंगा" ऐसे म्हणनारा एक वर्ग"भैय्या" आठवणी कडवट करून गेला परंतु आर्थिक परिस्थिति ठीक नसताना सुध्दा स्वताचे योगदान देणारा प्रकाश सर्वांच्या स्मृतिंमधे एक चिरकालीन छाप सोडून गेला.लज्जतदार जेवण आणि धडाकेबाज डी जे याने भारलेले वातावरण. विद्यार्थ्यांनि कॉलेज शी सदैव बांधीलकी जोपासावि ऎसे बोंगुलवार सरांचे भावनिक आवाहन आताही परत कॉलेज मधे जाऊन काही तरी चांगले करण्याची प्रेरणा देते. प्रत्तेक सीनियर ला मंचावर बोलवून त्याच्यावर काही तरी फिश पौंड मधील कमेंट, त्यावर त्याचे मत आणि मग त्याच्यासाठी एक स्पेशल गाणे आणि स्मृतिचिन्ह प्रदान करता करता सर्वांच्या डोळ्यातिल पाणी लपता लपत नव्हते.
                 कालपरत्वे आज सर्व आपापल्या आयुष्यात व्यस्त झालेत, मी सुध्दा पॉलीला व्याख्याता म्हणून शिकवायला लागलो. पण मला रेलवे मधे नोकरी लागली आणि हा व्याख्याता म्हणून प्रवास थांबला. मात्र मी सोडून जाताना मला दिलेला फेयरवेल पुन्हा पुन्हा स्मृतिना आर्द्रता प्रदान करते. माझ्या विद्यार्थ्यांनि बाहेर हॉटेल मधे दिलेला फेयरवेल, काहिनी आणखी दुसऱ्या ठिकाणी आयोजित केलेला फेयरवेल, कॉलेज मधे आयोजित फेयरवेल, माझ्यावर जीवापाड प्रेम करणाऱ्या माझ्या मित्र सुयोग,संदीप, पंकज, जयंत, रोशन, संजय, स्वप्निल यांनी  गुपचुप चारुन केलेला फेयरवेल, असे काही भावविवश करणारे क्षण मी जाताना अनुभवले.
                



                    फेयरवेल म्हणजे अंतिम निरोप नसतोच तो असतो शुभेच्छासह निरोप देण्याचा कार्यक्रम, आणि म्हणून निरोप समारंभाला "फेयरवेल" आणि अंतिम निरोपाला "फ्यूनरल" म्हणतात. मात्र हा निरोप चांगल्या पद्धतीने व्हावा हे आपल्या सर्वांच्याच हातामधे असतो. आपण किती चांगले क्षण सोबत घालवले, आपण किती माणुसकीने वागलो, आपण काय चाँगले करून निरोप घेत आहोत या सर्वांवर आपले फेयरवेल आणि फ्यूनरल दोन्ही आधारित असतात
.आणि म्हणून जेवढे चांगले करता येणार तेवढे करण्याचा प्रयत्न करावा कारण आयुष्याच्या शेवटी पद, प्रतिष्ठा पैसा संपत्ति श्रीमंति काहीच सोबत जात नाही असे योगेश्वर श्रीकृष्णाने भगवदगीते मधे म्हटले आणि ते चिरंतन सत्य आहे. "यु ही पहलु में बैठे रहो, आज जाने की जिद ना करो" ऎसे म्हटले तरी थांबने शक्य नसते, आलेली वेळ कोणाला चूकवता येत नाही कारण "आनेवाला पल जानेवाला है". आणि म्हणून "हो सके तो इस में जिंदगी बिताले, पल जो ये जानेवाला है". असे गीतकार म्हणून गेलेत.
                  माझ्या नाशिबाने मला आतापर्यन्त अशा चांगल्या आठवणी देणारे अनेक मित्र, मार्गदर्शक, हितचिंतक भेटले. ज्यानी माझ्यासोबत नेहमी चांगलेच केले. ज्यानी स्वताच्या चांगुलपणाच्या वागणुकीतुन सदैव मला काही तरी चांगले करायची प्रेरणा दिली, सदैव देत असतात. ज्यानी फक्त निरोप घेतला आहे, शरीराने दूर आहेत, पण ज्यांच्या विचारांचा आणि आचारांचा पगडा माझ्या सोबत निरंतर चालत राहील अशा माझ्या सर्व प्रिय जनांना एवढेच म्हणावेसे वाटते की 'मी तुमची कधीच आठवण करत नाही, पण मला क्षणोक्षणी तुम्हा सर्वांची कमतरता जाणवते." आणि ही कमतरता पुन्हा आठवण करून देते ह्या हातातून निसटनाऱ्या क्षणांची..जैसे हे गीत आठवण करून देते
       "इक बार यु मिली मासूम सी कली
       खिलते हुए कहा खुशवास मैं चली
       .....
       .......
       थोड़ा सा हसा के थोड़ा सा रुलाके
       पल जो ये जानेवाला है

       आनेवाला पल जानेवाला है..!"


शनिवार, 3 जनवरी 2015

सावित्री मी

              ५-६ दिवसा अगोदर रात्रि झोपी जायच्या आधी मी त्या दिवसातिल सर्व घटनाक्रम आठवत होतो. माझे काय चुकले, काय चांगले केले, काय वाईट याचा हिशेब मांडत होतो. तेव्हा मला त्या दिवशीच्या एका प्रसंगाची आठवन झाली नि मी विचारचक्रात अडकलो.
             मी वर्गात मैनेजमेंट हां विषय अंतिम वर्षाच्या विद्यार्थ्यांना शिकवत होतो. त्यात उत्पादन क्षेत्र, सेवा क्षेत्रावर चर्चा सुरु होती. मी या क्षेत्रात कार्यरत दोन महिलांची नावे उच्चारली, 'इंद्रा नूयी' व 'वृंदा कोचर'. पूर्ण वर्गाचे हावभाव असे होते की जसे मी परग्रहावरिल कोण्या व्यक्तींचे नावे घेतली नि त्यामुळे "ह्या कोण बा..?" असा प्रश्न त्यांना सर्वांना पडला होता. या दोन महिलांचे नाव सुध्दा ज्यानी ऐकले वाचले नाहित ते स्वाभाविकता त्यांच्याविषयी बोलण्यात असमर्थ ठरले. मनात खुप वाईट वाटले. मग मी या दोन्ही कर्तृत्ववान महिलांची जुजबी माहिती वर्गाला दिली नि मग म्हणालो की "कमीत कमी मुलींना तरी यांच्याविषयी माहिती राहायला हव. या अशा कार्यक्षम महिलांमुळे सर्व मुलीना व स्त्रियांना मान उंचावून वागता येते, पण दुर्दैवाने आम्हाला यांच्या ऐवजी ज्यांच्यामुळे प्रसंगी मान खाली घालायची पाळी येते त्या चित्रपट अभिनेत्रींची इत्यम्भुत माहिती असते.!"
             मी जे बोललो ते चुक की बरोबर नि किती टक्के ते बरोबर..? हाच प्रश्न मला छळत होता. मग विचार केला की नाही मी जे बोललो ते बरोबरच होते. कारण आज खरेच अशी परिस्थिति आहे की ज्या असंख्य स्त्रियानी आपल्या खडतर आयुष्यातून मुलीना प्रेरणा दिली त्यांच्या विषयी आमच्या मुली पुरेशा ज्ञात नाहीत. ज्या एका महानस्त्रीमुळे सर्व स्तारातिल स्त्रियांना शिक्षणाचे दार उघडे झालीत, कमीत कमी त्या सावित्री विषयी आमच्या लेकि पुरेश्या ज्ञात नाहित, हे बघून दुःख होते. आणि जर मग मुली स्वताच्या अभिमानास्पद गौरवास्पद वारशाबद्दल अशा अज्ञात असतील तर मग आमच्या स्वाभिमानाच्या मानमर्यादा कोण सांभाळणार..?
             हो.! हां वारसा आहे त्या सावित्रिचा जिने दगड धोंडे खाल्ले पण आमच्या आया बहिनींसाठी शाळा सुरु करून ती यशस्वीरित्या ते कार्य पार पाडले. हा वारसा आहे त्या रानी लक्ष्मीबाईचा जीने पुरुषी पेहराव चढवला इंग्रज सरकार विरुध्द रनशिंग फुकन्यासाठी व स्वताची आहुति स्वातन्त्र्ययज्ञात दिली. हा वारसा आहे त्या अहिल्याबाई होळकर यांचा ज्यांनी पतीच्या मागे सती न जाता हजारो प्रजाजनांना लेकरे समजुन त्यांच्या कल्याणासाठी राज्यकारभार केला. हा वारसा आहे त्या किरण बेदिंचा ज्यांनी त्याकाळी एक पोलिस अधिकारी म्हणून आदर्श प्रस्थापित केला व प्रस्थापित व्यवस्थेविरुध्द लढ़न्याचि जिगर दाखवून दिली. हां वारसा आहे त्या सुधा मुर्तिन्चा ज्यांनी त्या क़ाळी अभियांत्रिकी क्षेत्रात होणारा स्त्री पुरुष भेद दूर करावा म्हणून चक्क टाटा समुहाला पत्र पाठवले व कंपनी मधे जबाबदारी पार पाडून दाखवली.
              आज जेव्हा महिला सर्व क्षेत्र पादाक्रांत करत आहेत त्याच बरोबर एका बाजुला महिलांच्या सुरक्षिततेचा मुद्दा ऐरणीवर आला आहे. आज बलात्कारांचे, छेड़छाड होण्याचे प्रमाण प्रचंड प्रमाणात वाढले आहेत. त्या अनुषंगाने मला असे वाटते की स्त्रियानी सुरक्षेच्या बाबतीत सुध्दा स्वयंपूर्ण व्हावे. स्वताच्या सुरक्षेसाठी कुठल्या पुरुषावर अवलंबून राहण्यापेक्षा स्त्रियांनि आत्मनिर्भर व्हावे. नि सर्वात महत्वाचे म्हणजे प्रत्तेक स्त्रीने आपल्या मुलांना इतर स्त्रिया, मुलींचा आदर करायला शिकवावे. परस्त्रीला मातेसामान माननारे शिवराय मुलाना शिकवायला हवेत. म्हणजे स्त्रियांवारिल अत्याचारात घट होईल.
                शिवाजी शिकवताना मात्र एका गोष्टीचा विसर आम्हास पड़ता कामा नये शिवाजी घडला कारण जिजाऊचे संस्कार व तिची शिकवण तशी होती. मग मुलानी शिवाजी व्हावे म्हणजेच आम्हाला आधी जिजाऊ बनायची तयारी ठेवावी लागेल. स्त्रियाना आधी स्वताच्या स्त्रित्वाचा अभिमान व आदर बाळगावे लागेल. इतर स्त्रियांविषयी आदर, काळजी, सहानुभूति व सहकार्याची भावना सतत बाळगावी लागेल. स्वताला कणखर बन्वाव्व लागेल. नि यासाठी स्त्रियांचा गौरवशाली वारसा स्मरण करणे व पीढ़ी दर पीढ़ी तो जतन करणे गरजेचे आहे. चित्रपटातील नायिकेंचे आदर्श ठेवण्याऐवजी कर्तृत्ववान महिलांचे आदर्श डोळयासमोर ठेवावे लागेल. स्वताच्या नखांना रंग लावत असतानाच स्वताच्या मनाला नि शरीराला बळकट बनवावे लागेल. आज सावित्रीबाई फूलेंची जयंती साजरी करत असताना'आम्ही सावित्रिच्या लेकि' असे म्हणतानाच आता वेळ आली आहे 'सावित्री मी ' बनायची..!

मंगलवार, 30 सितंबर 2014

नवरात्रि-शक्तिची उपासना, उत्सव मातृत्वाचा



                       "नवरात्रि शक्ति का पर्व है
                     नवरात्रि शुध्दिकरण का पर्व है"
         काल रात्रि टीव्ही वर अमेरिकेतील न्यूयॉर्क मधील जगप्रसिध्द टाइम्स स्क्वेअर मधील मैडिसन स्क्वेअर गार्डन या विख्यात सभागृहात होत असलेला एक सोहळा बघत होतो, तेव्हा ऐकलेले हे वाक्य. हे वाक्य ज्या व्यक्तीने उच्चारले त्या व्यक्तिच्या सन्मानासाठी आयोजित केल्या गेलेला हा सोहळा अभूतपूर्व नि अदभुत असाच म्हणावा लागेल.
         मी तर आपला मोबाइल बंद करून हा कार्यक्रम सहपरिवार बघत होतो. हा कार्यक्रम आपले मानणीय पंतप्रधान श्री नरेन्द्रजी मोदी यांच्या अमेरिका भेटीप्रसंगी तेथील भारतीय समुदायानी त्यांच्या आदरातिथ्यासाठी हा दिमाखदार कार्यक्रम आयोजित केला होता. आणि या कार्यक्रमातील आपल्या उदबोधनाला सुरवात करताना नरेन्द्र मोदींनी वरील वाक्य उच्चारले, "नवरात्रि शक्ति का पर्व है, नवरात्रि शुध्दिकरण का पर्व है.!"
खरोखर आपण सर्व विचार केला तर आपले सुध्दा नवरात्रि विषयी आपल्या पंतप्रधानांच्या मतासारखेच विचार आहेत. आपण मोठ्या भक्तिभावाने हा नवरात्रि उत्सव साजरा करतो. बरेच जन दिवस निरंकार उपवास ठेवतात, कोणी दिवस पादत्राण घालत नाहीत, आदि अनेक रीतीने व्रत ठेवतात.
         पण सर्वात मोठा विचार केला तर नवरात्रि हा शक्ति उपासनेचा उत्सव आहे.
                      "या देवी सर्व भूतेषु शक्ति रुपेन संस्थिता, नमस्तस्यै नमस्तस्यै नमस्तस्यै नमो नमा: "
        या पध्दतीने आपण आदिमाया देवीची शक्तिरुपात आराधना करतो, म्हणजे शक्तिची उपासना करतो. कारण स्पष्ट आहे जर आपल्याला जगात अभिमानाने उभे रहायचे असेल तर शक्तिसंपन्न होणे गरजेचे आहे. देवीने महिषासुराचा वध केला तो शक्तीच्या आधारानेच. हातातील शस्त्रानि. आज जेव्हा भारत चहु बाजूनी वेढला गेला असताना आपल्या राष्ट्राची सामरिक शक्ति सम्पन्नता वाढवणे गरजेचे आहे. मग त्यासाठी आपल्या लष्कर, नौदल वायुदल आणि निमलष्करी दल यांना आवश्यक आधुनिक शस्त्रास्त्रे उपलब्ध करून द्यावी लागतील. आंतरिक सुरक्षा सांभाळणारया पोलिस दलाला पुरेश्या सुविधा पुरवने गरजेचे आहे. जेणेकरून कोणीही आंतरिक वा बाह्य शत्रु आपल्याकड़े वाकड्या नजरेनी बघणार नाही.
         फ़क्त सामरिक दृष्टयाच नाही तर बौद्धिक आर्थिक शक्ति संपन्नता येने सुद्धा अतिशय निकडेची. आज साऱ्या जगात भारतीय बुध्दिमत्तेला मागणी आहे. जगातील डॉक्टर्स, अभियंते, सॉफ्टवेर प्रोफेशनल, शिक्षक  हे भारतीय वंशाचे आहेत. आज बड्या बड्या कंपनीचे प्रमुखपदी भारतीय वंशाचे लोक आहेत. उदाहरणच घ्यायचे झाल तर माइक्रोसॉफ्ट या कंपनीच्या मुख्य कार्यकारी अधिकारी पदी सत्या नडेला यांची निवड होणे.
         गेल्या काही वर्षात आपण तंत्रज्ञान क्षेत्रात शक्तिसंपन्न होण्याच्या दृष्टीने काही महत्वाचे पावले उचलली आहेत. डॉ. . पी. जे. अब्दुल कलाम यांच्या नेतृत्वात आपण अग्नि पृथ्वी नाग त्रिशूल आदि क्षेपनास्त्रे निर्माण केलीत. नुकत्याच झालेल्या एका गौरवास्पद घटनेचा आपणास सन्दर्भ घ्यावाच लागेल. आपल्या अवकाश संशोधन संस्था ईसरो (ISRO) नि मंगळ ग्रहावर आपले यान पाठवले. या मोहिमेची विशेषता म्हणजे पहिल्याच प्रयत्नात आपण यश प्राप्त केले. तसेच सर्वात मोठी विशेषता अभिमानाची बाब म्हणजे अवघ्या ४५० कोटि मधे स्वदेशी तंत्रज्ञानाचा वापर करून ही मोहिम यशस्वी केल्या गेली.
                                  "बलहीनों को कोई पुछता
                बलवानो को विश्व पूजता."
ह्या नियमाला लक्षात ठेवून आज आपली शक्तिसंपन्न होण्याच्या दिशेने यशस्वी वाटचाल सुरु आहे.
मात्र ही शक्तिसंपन्नता येण्यासाठी कारणीभुत असते ती म्हणजे देवी, जिला आपण माता म्हणतो. मुळात या मातेच्या पूजनाचा उत्सव म्हणजे नवरात्र. कुठल्याही उर्जेची, कुठल्याही नवनिर्माणाच्या मुळाशी असते माता.
                                   "तू दुर्गा तू भवानी
                 संसाराची तूच जननी
                 सारी माया तुझी
                  अम्बे कृपा करी..!"
असे म्हणत आम्ही त्या आदिश्क्तिच्या मातृरुपाचेच आवाहन करतो. नवरात्रात कुमारिका पुजनाची पध्दत रूढ़ आहे. आपण लहान लहान बालिकाना घरी बोलावून त्यांचे पूजन करतो, त्यांना गोड खाऊ घालतो. हे सर्व याच साठी की त्यांच्यात देवीचा अंश असतो. मग आपण गर्भातील उमलत्या कळया खुड़ताना त्यांच्या देवी स्वरुपाचे स्मरण का करत नाही.
         मागल्या वर्षी वंशवेल नावाचा सुंदर मराठी चित्रपट आला होता ज्यात स्त्रीगर्भाची कशी ह्त्या होते नि यात सुशिक्षित म्हणल्या जाणारे लोक कसे सामील असतात याचे विदारक पण सत्य चित्रिकरण होते. फ़क्त मुलगाच पाहिजे या हट्टापायी संसार उध्वस्त करणारी कथा "मोकळा श्वास" या चित्रपटाच्या माध्यमातून मांडल्या गेली होती.
         काय दुःखद आणि विदारक दुजाभाव आहे बघा, एकी कड़े आपण देवी प्रसन्न व्हावी म्हणून बालिकांचे पूजन करतो नि दूसरीकड़े जन्माला यायच्या आधीच गर्भात हत्या करतो. आज गर्भाच्या आतच नाही तर बाहेर रस्त्यावर सुध्दा आमच्या आया बहिणी सुरक्षित नाहित. पुरुषी मानसिकतेचा राक्षसी चेहरा आपण दोन वर्षांपूर्वी दिल्लीत झालेल्या अमानुष अत्याचाराच्या घटनेत पाहिले. आपल्याला खरोखर देवीची आराधना करायची आहे तर आज आपण स्त्रीच्या मातृत्वाचा सन्मान करायला सुरवात करणे गरजेचे आहे.
         नवरात्रिनंतर येते विजयादशमी, म्हणजे विजयाचा जल्लोष. रावणाचा वध, पांडवांचे पुनरागमन, महिषासुराचा वध म्हणजेच नीतिचा अनीतिवर, सत्याचा असत्यावर, धर्माचा अधर्मावर विजय. या नवरात्राच्या समाप्ति होत असताना आपण प्रण घेऊया, आपला देश शक्तिसंपन्न, बलवान बनवण्यासाठी झटण्याचा आणि आदि आनादी शक्तीचे चिरंतन स्त्रोत असणाऱ्या मातृशक्तिचे म्हणजे स्त्रीवर्गाचे सन्मान कायम अबाधित ठेवण्याची प्रतिज्ञा घेऊया.